anil deshmukh esakal
महाराष्ट्र बातम्या

तुरुंगात अनिल देशमुख पडले; होणार शस्त्रक्रिया, जे जे रुग्णालयात दाखल

सकाळ डिजिटल टीम

मुंबई: राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या खांद्याला दुखापत झाली आहे. शुक्रवारी ही घटना घडली होती. कारागृहात चालत असताना ते पडले आणि त्यामुळे त्यांच्या खांद्याला मार लागल्याची माहिती मिळत आहे. सध्या देशमुखांना उपाचारांसाठी जे जे रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले आहे. त्यांच्यावर लवकरच शस्त्रक्रिया होणार आहे.

अनिल देशमुखांना उपचारांसाठी शुक्रवारीच रुग्णालयात दाखल करण्यात आल्याची माहिती सूत्रांकडून देण्यात येत आहे. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, अनिल देशमुख जेलमधील बाथरूम मध्ये घसरून पडले. तेव्हापासून ते रुग्णालयात आहेत. आज त्यांचा MRI काढण्यात आला आहे. चालत असताना पडले आणि त्यामुळे त्यांचा खांदा डिसलोकेट झाला आहे. त्यामुळे त्यांना दुखापत झाली असून त्यांच्यावर शस्त्रक्रिया करण्यात येणार आहे. शुक्रवारी त्यांना जे जे रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलं आहे.

अद्याप यासंदर्भातील आणखी माहिती मिळाली नसून यासंदर्भातील सविस्तर माहिती जे जे रुग्णालयाकडून देण्यात येणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

अकरावी प्रवेशाची उद्या पहिली गुणवत्ता यादी! विद्यार्थ्यांच्या मोबाईलवर येणार मेसेज; १२.५१ लाख विद्यार्थ्यांची नोंदणी, प्रत्येक फेरीपूर्वी नावनोंदणीची संधी

Vaibhav Sooryavanshi ओपनर, सोबतीला कोण? IPL 2026 मधील अनकॅप्ड खेळाडूंची प्लेइंग इलेव्हन, तगड्या संघाला देईल टक्कर...

Latest Marathi News Live Update : छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील कन्नड तालुक्यातून वाहनधारकांसाठी दिलासादायक बातमी

Fishing Ban: मच्छीमारांसाठी महत्त्वाची बातमी! महाराष्ट्रात मासेमारी बंद राहणार; महायुती सरकारचा मोठा निर्णय

Loni Kalbhor Crime : बारावीच्या अल्पवयीन विद्यार्थिनीवर अल्पवयीन मुलाकडून वारंवार अत्याचार; मुलाविरुद्ध गुन्हा दाखल

SCROLL FOR NEXT