anil parab e sakal
महाराष्ट्र बातम्या

'बंदी असताना फडणवीस फटाके कसे फोडणार?' अनिल परब यांचा सवाल

सकाळ डिजिटल टीम

मुंबई : माजी गृहमंत्री अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांना ईडीने मध्यरात्री अटक केली. त्यानंतर भाजप नेते किरीट समोय्या यांनी ''अनिल देशमुखांच्यानंतर पुढचा नंबर अनिल परब यांचा असेल'' असा दावा केला होता. आता त्यावर मंत्री अनिल परब (Anil Parab) यांनी प्रतिक्रिया दिली आहे. तसेच त्यांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसांना देखील टोला लगावला आहे.

''मी न्यायालयीन प्रक्रियेला मानणारा माणूस आहे. मला ईडीचं कुठलंही समन्स आलेलं नाही. यापूर्वीही मी ईडीच्या ऑफिसमध्ये गेलो आणि त्यांना उत्तरं दिलेय. मला कोणीही प्रश्न विचारले तरी मी उत्तर द्यायला तयार आहे'', असे अनिल परब म्हणाले.

परमबीरसिंह यांना कोणी विदेशात पाठविले? असा प्रश्न विचारला असता, परब म्हणाले, '' त्यांना चौकशीसाठी बोलावले जाते. ते आले नाहीतर त्यांना फरार घोषित केले जाईल. तसेच देवेंद्र फडणवीसांनी दिवाळीनंतर बॉम्ब फोडणार असं वक्तव्य केलं होतं. त्यावर देखील त्यांनी टीका केली आहे. फटाक्यावर बंदी आहे, मग फडणवीस फटाके फोडणार कसे? असा सवाल त्यांनी उपस्थित केला.

राष्ट्रवादी आणि शिवसेनेला तपास यंत्रणांकडून टार्गेट केलं जातंय. आमच्यावर झालेल्या आरोपांचं उत्तर देऊन आमची बाजू मांडणं हे आमचं काम आहे. आम्ही ते करतो, असेही परब म्हणाले. तसेच त्यांनी नवाब मलिकांकडून समीर वानखेडे यांच्यावर होत असलेल्या आरोपावर देखील भाष्य केले. ''महाराष्ट्राच्या राजकारणात असं कधीही झालं नव्हतं. असं होऊ नये अशी माझी इच्छा आहे. शेवटी प्रत्येकाचं खासगी आयुष्य आहे. तेच खासगीच राहावं'', असंही अनिल परब म्हणाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Accident Inside Story : बस थांब्याजवळ शेकोटी करून उभारले...अन्‌ तिघांच्या आयुष्यातील शेवटचा थांबा ठरला, एकाच वेळी तीन कुटुंब उद्ध्वस्त

इतिहासाला झळाळी देणारे नाव विश्वास पाटील

Astronomical Events 2026: नववर्षात ४ सुपरमून, २ ब्लूमून व १२ उल्कावर्षाव; देशवासीयांना विविध खगोलीय घटनांची मिळणार पर्वणी

Paush Purnima 2026: 2 कि 3 जानेवारी? यंदा वर्षातील पहिली पौर्णिमा कधी? जाणून घ्या शुभ मुहूर्त

रोहित शर्मा, विराट कोहली यांनी खेळणं सोडलं तर काय होईल? R Ashwin च्या धक्कादायक दाव्याने क्रिकेटविश्वात खळबळ

SCROLL FOR NEXT