anil parab resort  sakal
महाराष्ट्र बातम्या

दापोली रिसॉर्ट प्रकरण: अनिल परब यांना ईडीचं समन्स; आज हजर राहण्याचे आदेश

दापोली रिसॉर्ट प्रकरणात ईडीने त्यांना आज चौकशीसाठी हजर राहण्याचे आदेश दिले आहेत.

सकाळ डिजिटल टीम

मुंबई : शिवसेनेचे नेते अनिल परब यांना ईडीचं समन्स आलं आहे. दापोली रिसॉर्ट प्रकरणात ईडीने त्यांना आज चौकशीसाठी हजर राहण्याचे आदेश दिले आहेत. परिवहन मंत्री अनिल परब यांच्या निवासस्थानावर ईडीने मागच्या काही दिवसांत छापा टाकला होता.

(Anil Parab ED Summons)

भाजपचे किरीट सोमय्या यांनी त्यांच्यावर मनी लॉड्रिंगचा आरोप करत काही पुरावे ईडी कार्यालयात दाखल केले होते. त्यानंतर त्यांच्या निवासस्थानावर आणि त्यांच्याशी संबंधित काही लोकांच्या घरी ईडीने धाडी टाकल्या होत्या. त्यानंतर आता परब यांना चौकशीसाठी हजर राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

दरम्यान ईडीने छापा टाकल्यावर परबांची तब्बल तेरा तास चौकशी करण्यात आली होती. चौकशी संपल्यानंतर त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. पर्यावरणाची दोन कलमे लावून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ईडीच्या सर्व प्रश्नांची उत्तरे दिली. कोणत्याही चौकशीला सामोरे जाण्यास तयार असल्याचे परिवहन मंत्री अनिल परब म्हणाले होते. सर्व गोष्टींचा खुलासा कोर्टात देणार असल्याचं ते म्हणाले होते.

परिवहन मंत्री अनिल परब यांच्याशी संबंधित सात ठिकाणी २६ मे रोजी सकाळी सकाळी ईडीने छापे टाकले होते. त्यानंतर त्यांनी अनिल परब यांची चौकशी केली होती. आता परत त्यांना ईडीकडून समन्स पाठवण्यात आलं आहे. त्यानुसार त्यांना आज चौकशीसाठी हजर रहावे लागणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

सरकारने माझ्या मागण्या मान्य केल्या, ३० दिवसांचा रिचार्ज, डेटाशिवाय प्लान मिळणार; राघव चड्ढांची पोस्ट

Ashutosh Ranka Detained : गुवाहाटीत आशुतोष रांका ताब्यात; हिमंता बिस्वा सरमांवर अभिजीत दीपकेंचा गंभीर आरोप, दिला मोठा इशारा

Asian Games : स्क्वॅशमध्ये दोन सुवर्णपदकं हुकली! अनाहत-अभय यांना रौप्य, तर बॉक्सिंगमध्ये दोन मेडल्स पक्के

Teacher Success Story: जिद्द, मेहनत अन् कुटुंबाची साथ..; बाबांचे स्वप्न लेकीने उचलले खांद्यावर; ज्योती शेलाराची शिक्षणप्रवासाची प्रेरणादायी कहाणी

Latest Marathi News Live Update : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या औषध निरीक्षक पेपरफुटीप्रकरणी मोठी अपडेट

SCROLL FOR NEXT