राज्याचे माजी कॅबिनेट मंत्री अनिल परब यांना दापोली येथील जमीन व्यवहाराशी संबंधित प्रकरणात सत्र न्यायालयाने अंतरिम अटकपूर्व जामीन मंजूर केला. खेड सत्र न्यायालयाने 14 नोव्हेंबरपर्यंत अंतरिम जामीन मंजूर केला. याप्रकरणात भाजप नेते किरीट सोमय्या यांच्या तक्रारीवरून एफआयआर दाखल करण्यात आला आहे.
शिवसेना नेता आणि माजी मंत्री अनिल परब यांच्याविरोधात मध्यरात्री गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यांच्या विरूद्ध आयपीसी 420 आणि 34 अंतर्गत हा गुन्हा दाखल झाला आहे. दापोलीच्या रिसॉर्ट प्रकरणात त्यांची ईडी चौकशी देखील झाली आहे.
दापोली येथील साई रिसॉर्ट हे अनिल परब यांच्या मालकीचे असून परब यांनी पर्यावरणाचे नियम धाब्यावर बसवून बांधकाम केले असल्याचा आरोप भाजप नेते किरीट सोमय्या यांनी केला आहे. त्याशिवाय, हे रिसॉर्ट खरेदी करण्यासाठी गैरमार्गाने कमावलेला पैसा वापरला असल्याचा आरोपही त्यांनी केला आहे.
दापोली येथील साई रिसॉर्ट हे अनिल परब यांच्या मालकीचे असून परब यांनी पर्यावरणाचे नियम धाब्यावर बसवून बांधकाम केले असल्याचा आरोप भाजप नेते किरीट सोमय्या यांनी केला आहे. त्याशिवाय, हे रिसॉर्ट खरेदी करण्यासाठी गैरमार्गाने कमावलेला पैसा वापरला असल्याचा आरोपही त्यांनी केला आहे.
दरम्यान, अनिल परब यांच्यासह तिघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मध्यरात्री 12 वाजण्याच्या सुमारास हा गुन्हा दाखल करण्यात आला. याची माहिती सोमय्या यांनी ट्विट करत दिली होती. दापोली पोलीस ठाण्यात रुपा दिघे यांनी दाखल केलेल्या तक्रारीनंतर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी अॅड. अनिल परब, सुरेश तुपे आणि अनंत कोळी यांच्याविरोधात भादंवि 34 आणि 420 नुसार गुन्हा दाखल केला. यानुसार एकहून अधिक व्यक्तींनी एकत्र येत गुन्हेगारी कट रचणे, फसवणूक आदी आरोप परब आणि इतरांविरोधात आहेत. आता परब यांना सेशन कोर्टाने दिलासा देत अटकपूर्व जामीन मंजूर केला आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.