Uddhav Thackeray esakal
महाराष्ट्र बातम्या

'ठाकरे सरकारच्या भ्रष्टाचाराचं स्मारक दिवाळीपर्यंत जमीनदोस्त होणार'

सकाळ डिजिटल टीम

दापोली येथील अनिल परब यांचं अनधिकृत साई रिसॉर्ट गणेशोत्सवानंतर पाडण्यात येणार असून, येत्या दीपावलीपर्यंत महाविकास आघाडीच्या भ्रष्टाचाराचे स्मारक जमीनदोस्त झालेले असेल, असा विश्वास भाजपचे नेते किरीट सोमय्यांनी व्यक्त केला आहे. सोमय्यांच्या या दाव्यानंतर खरंच परब यांच्या रिसॉर्टवर हातोडा पडणार का हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

रत्नागिरी जिल्हाधिकाऱ्यांनी अनिल परबांच्या अनधिकृत ट्वीन रिसॉर्टना तोडण्याचा आराखडा जाहीर केला आहे. सार्वजनिक बांधकाम विभाग टेंडर व पाडण्याचा तांत्रिक प्रक्रिया पूर्ण करणार असल्याचेही ते म्हणाले. रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली येथील या रिसॉर्टच्या बांधकामात अनियमितता असल्याचा तसेच याच्या बांधकामासाठी गैर व्यवहारातील पैसा वापरण्यात आला आहे. नोएडातील ट्विन टॉवर पाडले त्याप्रमाणेच दापोलीतील रिसॉर्ट पाडण्यात येणार असून, हे कोणत्या तंत्रज्ञानाने पाडायचे हेदेखील लवकरच ठरेल, असे सोमय्या म्हणाले.

रिसोर्ट पाडण्याचे कंत्राट आणि ते पाडल्यानंतर होणाऱ्या मलब्याची विल्हेवाट लावण्याचे कंत्राट कुणाला द्यायचे याची प्रक्रिया सुरू असून, गणपतीच्या कालावधीत ही प्रक्रिया पूर्ण होईल. त्यानंतर गणपतीनंतर हे तोडण्याची कारवाई केली जाईल अशी आशा आहे. दरम्यान, याबाबत मी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेऊन परब आणि नार्वेकरांच्या अनधिकृत पाडलेल्या बांधकामाजवळ बॅनर लावून महाराष्ट्रात भ्रष्टाचाराला जागा नाही असे फलक लावण्याची विनंती करणार असल्याचेही सोमय्यांनी म्हटले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nashik UPSC Exam: दोन मिनिटे उशीर अन् UPSC परीक्षा हातातून गेली! नाशिकमध्ये विद्यार्थी-पालक आक्रमक! खड्डे, पाऊस, ट्रॅफिकचा फटका

Mumbai Rain: मुंबईला पुढील 48 तास धोक्याचे! गणरायाच्या आगमनापूर्वी पावसाचा अलर्ट, हवामान खात्याकडून मोठी अपडेट

US Open Final: अल्काराझला हरवलं, टियाफोलाही धुतलं! बेन शेल्टन US Openच्या फायनलमध्ये; २२ वर्षांनंतर अमेरिकेचा खेळाडू इतिहास रचणार?

Marathi News Live Updates : दगडूशेठ गणपती मंडळाची जय्यत तयारी पूर्ण, वृंदावनच्या प्रेम मंदिराची भव्य प्रतिकृती ठरणार यंदाच्या मिरवणुकीचे आकर्षण

BRICS Dinner: शी जिनपिंग मोदींच्या मेजवानीला गैरहजर; पुतिनसह ब्रिक्स नेत्यांनी घेतला भारतीय शाकाहारी पदार्थांचा आस्वाद, मेनू काय होता?

SCROLL FOR NEXT