anjali damania slams ajit pawar over sharad pawar resigns as NCP chief Maharashtra Politics  Sakal
महाराष्ट्र बातम्या

Sharad Pawar Resigns : अजित पवार फारच उतावीळ….; शरद पवारांच्या राजीनाम्यावरून दमनियांचा टोला

रोहित कणसे

राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षपदावरुन निवृत्ती जाहीर केली आहे. यानंतर राजकीय वर्तुळात हालचालींना वेग आला असून राज्याथील कार्यकर्त्यांकडून शरद पवारांनी हा निर्णय मागे घ्यावा अशी मागणी केली जात आहे. शरद पवारांच्या या निर्णयाला राष्ट्रवादी काँग्रेसच्या सर्वच पदाधिकाऱ्यांनी विरोध केला आहे.

दरम्यान अजित पवार यांनी मात्र शरद पवारांच्या निर्णयाला पाठिंबा दिली आहे. शरद पवारांच्या निर्णयानंतर रडणाऱ्या कार्यकर्त्यांना त्यांनी खडसावल्याच दिसून आलं.

अजित पवारांच्या भूमीकेबद्दल सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी ट्वीट करत टोला लगावला आहे. “अजित पवार खूपच उतावीळ दिसत आहेत. शरद पवारांचा राजीनामा स्वीकारला जाईल याची ते खात्री करून घेत आहेत, असं दमानिया यांनी त्यांच्या ट्वीटमध्ये लिहिलं आहे.

अजित पवार काय म्हणाले...

अजित पवार म्हणाले की, "तुम्ही एक गैरसमज करुन घेत आहात की पवार साहेब अध्यक्ष नाहीत म्हणजे पक्षामध्ये नाहीत असा भाग नाही. आज काँग्रेसचे अध्यक्ष खर्गे आहेत पण सोनिया गांधींकडं पाहून चालली आहे. त्यामुळं शरद पवारांच्या आजच्या वयाचा विचार करता साहेबांशी आणि सर्वांशी चर्चा करुन एका नवीन नेतृत्वाकडं आपण ही जबाबदारी देऊ पाहतो आहोत. ते नेतृत्व साहेबांच्या मार्गदर्शनाखाली पार्टीचं काम करेल"

"शेवटी साहेब म्हणजेच पार्टी आहेत, हे कुणी येऱ्या गबाळ्यानं पण सांगायचं कारण नाही. आता पवार साहेबांनी निर्णय घेतला आहे. पवार साहेब लोकशाहीत जनतेचं ऐकत असतात हे मी कित्येक वर्षे पाहिलेलं आहे. चव्हाण प्रतिष्ठाण, सिल्व्हर ओकवरुन तुम्हाला साहेब आपल्याला वेळोवेळी मार्गदर्शन करतील. उद्या जो पार्टीचा अध्यक्ष होईल, तो पवारांच्या मार्गदर्शनाखाली काम करेल" असेही अजित पवार म्हणाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

मोठी बातमी! राज्यातील ३००० शाळांमधील शिक्षकांचा थांबणार पगार; ‘हे’ आहे मुख्य कारण; नववी-दहावीच्या वर्गांसाठी २० पट बंधनकारक, अन्यथा...

आजचे पंचांग आणि दिनविशेष - 16 फेब्रुवारी 2026

Satara Accident: कंटेनरच्या धडकेत महिला जागीच ठार; टोपजवळील अपघातात पती गंभीर जखमी, कऱ्हाड तालुक्यातून हळहळ व्यक्त!

Income Tax : ‘रिफंड’ मिळण्यास विलंब कशामुळे?

अग्रलेख : शेजारी ‘सख्खे’ होतील?

SCROLL FOR NEXT