Hinganghat Burning Case
Hinganghat Burning Case Hinganghat Burning Case
महाराष्ट्र

Hinganghat Burning Case : तब्बल दोन वर्षांनी मिळाला अंकिताला न्याय

नीलेश डाखोरे

नागपूर : प्रा. अंकिता पिसुड्डे हिला भरचौकात पेट्रोल ओतून जाळल्या प्रकरणी आरोपी विकेश ऊर्फ विक्की नगराळे याला गुरुवारी (ता. १०) जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा सुनावली. बुधवारी (ता. ९) जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायालयाने खुनाच्या गुन्ह्याखाली दोषी ठरविले होते. देशभरात गाजलेल्या या प्रकरणाच्या निकालाची सर्वांना प्रतीक्षा होती. याप्रकरणी न्यायालयाने निर्णय देत आरोपीला जन्मठेपेची शिक्षा सुनावली. विशेष म्हणजे आरोपीने पेट्रोल ओतून पेटवून दिल्यानंतर आठ दिवसांनी म्हणजे १० फेब्रुवारीला नागपुरात उपचारादरम्यान अंकिताचा मृत्यू झाला होता. आजच तिला न्याय मिळाला आहे. (Ankita got justice after two years)

अंकिता पिसुड्डे ही वर्धा जिल्ह्यातील हिंगणघाट तालुक्‍यात येणाऱ्या दारोडा गावात राहत होती. तिच्या घरी आई-वडील, भाऊ असे छोटेचे कुटुंब. वडील शेतकरी तर आई गृहिणी. वेळप्रसंगी शेतात जाऊन आई वडिलांना मदत करते. भाऊ शिक्षण घेत आहे. घरची परिस्थती फार चांगली नाही. अशाही परिस्थितीत वडिलांनी दोघा बहीण-भावाला शिक्षण दिले.

अंकिताने बॉटनीमध्ये एमएससीपर्यंत शिक्षण पूर्ण केले होते. कुटुंबीयांना मदत व्हावी म्हणून तिने नोकरी करण्याचे ठरवले होते. जवळपास दोन वर्षांपूर्वी बऱ्याच प्रयत्नानंतर तिला मातोश्री कुणावार महिला कॉलेजमध्ये तासिका प्राध्यापिकांची नोकरी लागली होती. तिथे ती विद्यार्थिनींना बॉटनी हा विषय शिकवत होती. घरची परिस्थिती चांगली नसल्याने कॉलेजमध्ये जाण्यासाठी गाडीही नाही. त्यामुळे रोज बसने कॉजेजमध्ये जात होती.

सोमवारी, ३ फेब्रुवारी २०२० रोजी अंकिता नंदोरी चौकातून पायी कॉलेजमध्ये जात असताना एकतर्फी प्रेम करणारा विकेश नगराळे याने पेट्रोल टाकून जाळण्याचा प्रयत्न केला होता. यानंतर तो घटनास्थळावरून पसार झाला. ती मदतीसाठी ओरड होती. मात्र, काहीही मदतीसाठी धाऊन आले नव्हते. काही वेळांनी तिथून जात असलेल्या सहकारी प्राध्यापिका आणि इतर युवकांनी आग विझवून मला रुग्णालयात दाखल केले. (Hinganghat Burning Case)

गंभीर भाजल्याने अंकिताला नागपुरातील खासगी रुग्णालयात दाखल केले होते. सात दिवस तिच्यावर उपचार झाले. मात्र, तिची प्रकृती अधिकच खालावली. यामुळे अंकिताला कृत्रिम श्‍वासोच्छासाचीही गरज भासली. मात्र, सोमवार (१० फेब्रुवारी २०२०) तिच्यासाठी ‘काळा’वार ठरला. सोमवारीच तिचा मृत्यू झाला. आजच म्हणजे गुरुवारी (ता. १० फेब्रुवारी २०२२) तिच्या मारेकऱ्याला जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली.

नागरिकांनी केली होती विकेश ताब्यात देण्याची मागणी

हिंगणघाटमध्ये प्राध्यापिकेला पेट्रोल टाकून जाळल्याची वार्ता समजताच अनेकांचा रोष अनावर झाला होता. संतप्त नागरिकांनी आरोपी विकेश नगराळेला त्याच घटनास्थळी पेट्रोल टाकून जाळून टाकण्याची मागणी केली. आरोपीला आमच्या ताब्यात देण्याची मागणी नागरिकांनी केली होती. यामुळे चांगलाच वाद झाला होता.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nashik Loksabha: नाशिक मोठा ट्विस्ट; स्वामी शांतिगीरी महाराजांनी शिवसेनेकडून दाखल केली उमेदवारी, पण...

Lok Sabha Election 2024: "PM मोदींची उमेदवारी रद्द करा"; निवडणूक आयोगाला निर्देश देण्यास हायकोर्टाचा नकार

Latest Marathi News Live Update: काँग्रेसने 'कलम 370'ला आपल्या अवैध मुलाप्रमाणे सांभाळलं; अमित शाहांची बोचरी टीका

Google layoffs: सुंदर पिचाई यांचा मोठा निर्णय; संपूर्ण 'पायथन' टीमला दाखवला बाहेरचा रस्ता, काय आहे कारण?

Team India squad T20 WC24 : विकेटकीपर म्हणून संजू सॅमसन बनला निवडकर्त्यांची पहिली पसंती; कोणाचा पत्ता झाला कट?

SCROLL FOR NEXT