Sanjay Raut 
महाराष्ट्र बातम्या

Anna Hajare : अण्णा गप्प का, असा प्रश्न...; भूखंड घोटाळ्याच्या मुद्द्यावर संजय राऊत भडकले

सकाळ डिजिटल टीम

नवी दिल्ली - मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर करण्यात आलेल्या कथित भूखंड घोटाळ्याच्या आरोपावरून राज्याचं राजकारण ढवळून निघत आहे. विधीमंडळाच्या अधिवेशनातही भूखंड घोटाळा गाजला. आता यावरून शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी एकनाथ शिंदे यांच्यावर हल्लाबोल केला. तसेच ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी मौन का धारण केलं, असा सवालही उपस्थित केला. (Anna Hajare news in Marathi)

राऊत म्हणाले की, मुख्यमंत्र्यांवर झालेले आरोप गंभीर आहे. केंद्र सरकारमधील अनेक लोकांना या घोटाळ्याबाबतची कागदपत्र आम्ही सुपूर्द केली आहे. ते योग्य ठिकाणी पोहोचले आहेत. देवेंद्र फडणवीस शुक्रवारी घाईने दिल्लीत आले होते. का आले माहित नाही, पण या विषयावर त्यांची इथे चर्चा झाली असेल. मुख्यमंत्र्यांनी ११० कोटींचे भूखंड केवळ दोन कोटीत आपल्या मर्जीतील बिल्डरांना दिल्याचा आरोप राऊत यांनी केलं. हे भूखंड गरिबांच्या घरांसाठी राखीव ठेवण्यात आले होते, असंही ते म्हणाले.

दरम्यान न्यायालयाने देखील यावर ताशेरे ओढले आहे. मात्र मागील २४ तासात याप्रकरणी न्यायालयाचे समाधान झाले असेल. मात्र तो भ्रष्टाचार आहे. अण्णा हजारे गप्प का, असा प्रश्न मी विचारत नसून समाजमाध्यमांवर विचारला जातो. या महाराष्ट्र सरकारने बोहणीचा ११० कोटींचा भ्रष्टाचार केला. गरिबांना घर मिळाली नाही. मात्र मुख्यमंत्री सारवासारव करतात. मोदींच्या विचारधारेची ही फसवणूक आहे, असंही राऊत यांनी म्हटलं.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ZIM, T20 WC: संजू सॅमसनला संधी दिली जाणार का? भारतीय प्रशिक्षकाचं स्पष्ट उत्तर; म्हणाले, आमचे दोन्ही ओपनर डावखुरे आहेत...

Illegal Cattle : कुपवाडमध्ये कत्तलीसाठी जनावरांची अमानुष वाहतूक; पोलिसांची धडक कारवाई, पाच जणांवर गुन्हा

मी खचले होते... 'कमळी' मधील अन्नपूर्णा आजींवर एका कारणामुळे झालेली टीका; म्हणाल्या, 'माझ्यात कमी...'

Latest Marathi News Live Update : यवतमाळच्या वणीत आलिशान दुमजली घरात बनावटी दारू कारखाना,राज्य उत्पादन शुल्क विभागाची धाड

Stock Market Today: शेअर बाजार हिरव्या रंगात बंद! सकाळच्या तेजीला दुपारी ब्रेक; कारण काय? कोणते शेअर्स वाढले?

SCROLL FOR NEXT