Anna-Hazare 
महाराष्ट्र बातम्या

अण्णा हजारेंचा आता दुकानात वाईन विक्रीविरोधात उपोषणाचा इशारा

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना लिहिलं पत्र

Amit Ujagare (अमित उजागरे)

मुंबई : ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे (Anna Hazare) यांनी पुन्हा एकदा उपोषणाचं हत्यारं उपसण्याचा इशारा राज्य शासनाला (MVA Govt) दिला आहे. यावेळी दुकानात वाईन विक्रीच्या सरकारच्या निर्णयाविरोधात हजारेंनी आपली भूमिका मांडली आहे. यासाठी त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांना पत्रही लिहिलं आहे. (Anna Hazare now warns against selling wine in super markets in Maharashtra)

सरकारनं हा निर्णय मागे घ्यावा अन्यथा या निर्णयाविरोधात बेमुदत उपोषण करण्यात येईल, असा इशारा अण्णांनी पत्रातून महाविकास आघाडी सरकारला दिला आहे.

काही दिवसांपूर्वीच राज्य सरकारने आयात केलेल्या मद्यावरील शुल्काचा दर 300 टकक्यांवरून 150 टक्के केला होता. त्यानुसार दारूच्या निर्मिती शुल्काचा विचार करून दारूचे नवीन दर उत्पादन शुल्क विभागाने जाहीर केले होते. तसेच आता किराणा दुकान आणि जीवनावश्यक वस्तू मिळण्याच्या ठिकाणी म्हणजेच सुपर मार्केटमध्ये सुद्धा काही अटींसह वाईन विक्री (Wine Selling) केली जाणार आहे. त्यासाठी किराणा दुकान हे एक हजार चौरस फुटापेक्षा मोठं असलं पाहिजे ही अट घालण्यात आली आहे. दुकानात यासाठी एक शोकेस बनवून वाईन विक्री करता येणार आहे, असं सरकारनं आपल्या अध्यादेशात म्हटलं आहे.

या निर्णयामुळे आता शेतकऱ्यांना फायदा होणार आहे. तसेच वाईनच्या उत्पादनासाठी वापरण्यात येणाऱ्या शेती उत्पादनाला विक्रिसाठी व्यासपीठ मिळण्यास मदत होणार आहे. तसेच द्राक्षे, मोसंबी, संत्रा, ऊस तसेच वाईननिर्मितीसाठी लागणाऱ्या पिकाचे उत्पादन करणाऱ्या शेतकऱ्यांना या निर्णयाचा फायदा होईल. त्याचबरोबर राज्यात वायनरी जास्त असल्याने त्यांनाही या निर्णयाचा फायदा होणार असल्याचं सरकारनं म्हटलंय.

याअगोदर भाजपने गोवा, हिमाचलप्रदेश आणि भाजप शासित राज्यात हे धोरण आणलं आहे त्याचप्रकारे हे धोरण आता राज्यसरकारने महाराष्ट्रातही लागू केलं आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Baby Trafficking Case: चार वेळा विकलेले एक महिन्याचे बाळ तेलंगणमधून परत ताब्यात; संभाजीनगर पोलिसांनी बाळ विक्री रॅकेटचा पर्दाफाश

Uttarakhand: उत्तरकाशीत पावसाचे थैमान; ८० ट्रेकर्सची सुटका, उर्वरितांच्या बचावासाठी बचावासाठी ८ हेलिकॉप्टर्स मैदानात video viral

Marathi News Live Updates: दुष्काळाने ऊसही कडू केला; दिवाळी तोंडावर असताना महिला शेतकऱ्यांच्या डोळ्यात पाणी, जनावरांच्या चाऱ्यासाठी उभा ऊस विकण्याची वेळ

Oppo K14 Plus 5G स्मार्टफोन लाँच; 144Hz AMOLED डिस्प्ले आणि 45W फास्ट चार्जिंगचा धुमाकूळ! पहा किंमत...

Childhood Cancer Symptoms : मुलाला येणारा ताप केवळ सामान्य ताप नसू शकतो; पालकांनी 'या' धोक्याच्या घंटा कधी ओळखाव्या? तज्ज्ञांनी दिला गंभीर आजाराचा इशारा

SCROLL FOR NEXT