महाराष्ट्र बातम्या

भाजप सेनेच्या सत्तासंघार्षावर काय म्हणतायत 'अण्णा हजारे'?

सकाळ वृत्तसेवा

निवडणुकीवेळी गळ्यात गळे घालून फिरलेत, मग आता भांडण कशासाठी ? या भांडणामागे स्वार्थ आहे. फक्त पैसा आणि सत्तेसाठी दोन्ही पक्ष अडून बसलेत. या शब्दात जेष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी शिवसेना आणि भाजपवर घणाघाती टीका केलीये.

राळेगणसिद्धीमध्ये अण्णा हजारे पत्रकारांशी बोलत होते. एकदा गळ्यात हात टाकला की तो गळ्यातच राहायला हवा, सत्तेसाठीची भांडणं करणं समाज आणि देशाच्या हिताचं नसल्याचं अण्णा हजारे यांनी सांगितलंय. 

राज्यात अवकाळी पावसाने शेतकऱ्यांची कंबर मोडली आहे. शेतकऱ्यांच्या नुकसान भरपाईवर सरकारने लक्ष द्यावं. भारतासारख्या कृषिप्रधान देशात शेतकरी आत्महत्या होणं हे अतिशय लांच्छनास्पद असल्याचं अण्णा हजारे यांनी म्हटलंय.

शेतकऱ्यांचे प्रश्न समजून न घेता राज्यातील सत्ता संघर्ष हा अतिशय अपमानास्पद असल्याचंही अण्णा हजारे म्हटलेत. दरम्यान वेळ पडल्यास शेतकऱ्यांच्या प्रश्नावर आपण लक्ष घालू असंही अण्णा हजारे म्हणालेत. 

काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसमधे सत्ता स्थापनेच्या दरम्यान सुरू झालेल्या ‘मलईदार’ खात्याचे पडसाद भाजप-शिवसेना युतीच्या सत्तेवरही पडल्याचे चित्र आहे. मंत्रीमंडळातील प्रमुख ‘मलईदार’ विभाग मिळवण्यासाठी युतीतला तणाव शिगेला पोचल्याची चर्चा रंगली आहे. 

गृह, वित्त, महसुल, सार्वजनिक बांधकाम, ग्रामविकास, नगरविकास व जलसंपदा ही सत्तेतील सर्वात प्रभावी अशी ‘मलईदार खाती’ मानली जातात. राज्याच्या अार्थिक उलाढालीत या विभागांचा सर्वात मोठा सहभाग व वाटा आहे. राज्याच्या राजकारण व समाजकारणावर पकड कायम ठेवण्यासाठी हे विभाग महत्वाची भूमिका बजावतात. प्रचंड मोठा निधी व आर्थिक उलाढाल या विभागात होते. त्यामुळे या सात प्रमुख ‘मलईदार’ विभागांपैकी किमान तीन विभाग शिवसेनेला हवे आहेत. युतीत सत्तावाटपाचा फिफ्टी-फिफ्टी फाॅर्म्युला ठरलेला असल्याने शिवसेनेला ठरल्यानुसार या सात पैकी तीन विभाग हवे आहेत. मात्र जलसंपदा अथवा सार्वजनिक बांधकाम यापैकी कोणताही एक विभाग देण्यास भाजपची तयारी असल्याचे सुत्रांचे मत आहे. महसुल, गृह, नगरविकास व वित्त हे विभाग सोडण्यास भाजप कोणत्याही स्थितीत नाही. त्यावरूनच या मलईदार खात्यांच्या वाटपावरून युतीच्या सत्ता स्थापनेत मिठाचा खडा पडल्याचा दावा सुत्रांनी केला आहे.

webtite : anna hazare targets shivsena and bjp over government formation

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Kolhapur Killing Case : कोल्हापूरच्या शाहूवाडीतील पती, पत्नीचा खून करणारा निघाला ‘सीरियल किलर’; 'द व्हिलन' मुव्हीपेक्षाही भयानक प्रकरण

BSc Nursing Colleges: पायाभूत सुविधाच नाही, विद्यार्थी शिकणार कसे?; राज्यातील बीएससी नर्सिंग कॉलेजेसवर; प्राचार्य, उपप्राचार्यांची सक्तीने नियुक्ती

Latest Marathi News Live Update : सरकारकडे सर्व माहिती कर्जमाफीची वाट कसली पाहताय : उद्धव ठाकरे

Matheran Mini Train: ‘माथेरानची राणी’ पुन्हा धावणार! मार्ग दुरुस्ती, सुरक्षा तपासणी पूर्ण; पर्यटकांना दिलासा

Pune Traffic : महापालिकेची पथके उतरली रस्त्यावर, खड्डेमुक्त पुणे अभियान सुरू; खराब रस्त्यांची दुरुस्ती करणार

SCROLL FOR NEXT