Aundh Police Station
Aundh Police Station esakal
महाराष्ट्र

मोठी बातमी! साताऱ्यात एक लाखाची लाच घेताना दोन पोलिस अधिकाऱ्यांना अटक; 'अवैध दारू'प्रकरणी केली होती लाचेची मागणी

सकाळ डिजिटल टीम

या तक्रारीची शहानिशा करत दराडे, जाधव यांना लाच घेताना पकडण्‍यासाठीचा सापळा औंध येथील बाजार पटांगण परिसरात रचण्‍यात आला.

औंध (सातारा) : दारूची बेकायदेशीर वाहतूक केल्‍याप्रकरणी दाखल असणाऱ्या गुन्ह्या‍त मदत करण्‍याबरोबरच यापुढील कोणत्‍याही स्वरूपाचा त्रास न देण्‍याच्‍या बदल्‍यात एक लाखाची लाच स्‍वीकारत असताना सातारा लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने औंध पोलिस ठाण्‍यातील (Aundh Police Station) सहायक निरीक्षक आणि सहायक उपनिरीक्षकास ताब्‍यात घेतले.

दत्तात्रय दराडे आणि बापूसाहेब जाधव अशी त्‍या दोघांची नावे आहेत. औंध पोलिस ठाण्‍यात सहायक निरीक्षकपदी दत्तात्रय परशुराम दराडे आणि सहायक उपनिरीक्षकपदी बापूसाहेब नारायण जाधव हे दोघे कार्यरत होते. या पोलिस ठाण्‍याच्‍या हद्दीत मध्‍यंतरीच्‍या काळात बेकायदेशीर दारू वाहतूक करत असताना एक कारवाई करण्‍यात आली होती.

या कारवाईदरम्‍यान दारू वाहतूक करणाऱ्यांसह वाहन व दारू असा मुद्देमाल जप्‍त करण्‍यात आला होता. या दाखल गुन्ह्याच्‍या तपासादरम्‍यान मदत करण्‍याबरोबरच तसेच यापुढील काळात कोणत्‍याही स्वरूपाचा त्रास न देण्‍याच्‍या बहाण्‍याने दत्तात्रय दराडे आणि बापूसाहेब जाधव यांनी त्‍यातील संशयितांकडे दीड लाख रुपयांची मागणी केली.

तडजोडीअंती त्‍या दोघांनी एक लाख रुपये लाच स्वरूपात घेण्‍यास मान्‍यता दिली. याची तक्रार दाखल गुन्ह्यातील संशयिताने सातारा लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे (Satara Anti-Corruption Department) नोंदवली. या तक्रारीची शहानिशा करत दराडे, जाधव यांना लाच घेताना पकडण्‍यासाठीचा सापळा औंध येथील बाजार पटांगण परिसरात रचण्‍यात आला. सापळ्यादरम्‍यान त्‍या दोघांना एक लाखाची लाच घेताना पकडण्‍यात आले.

याप्रकरणी सहायक पोलिस निरीक्षक दराडे आणि सहायक उपनिरीक्षक जाधव या दोघांवर गुन्‍हा नोंदविण्‍याची प्रक्रिया रात्री उशिरापर्यंत औंध पोलिस ठाण्‍यात सुरू होती. ही कारवाई लाचलुचपत प्रतिबंध विभागाचे पोलिस अधीक्षक अमोल तांबे, अतिरिक्‍त पोलिस अधीक्षक शीतल जानवे यांच्या मार्गदर्शनाखाली उपअधीक्षक उज्ज्वल वैद्य, कर्मचारी नीलेश चव्हाण, तुषार भोसले, नीलेश येवले यांनी केली.

शासकीय अधिकारी व कर्मचारी कोणतेही शासकीय काम करण्यास फी व्यतिरिक्त लाचेची मागणी केल्यास त्वरित आमच्याशी टोल फ्री क्रमांक १०६४ वर संपर्क साधावा.

-उज्ज्वल वैद्य, पोलिस उपअधीक्षक, सातारा.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Accident : दोघांचा जीव घेणाऱ्याला 'अशी' शिक्षा; वाहतूक जागृतीचे फलक रंगवायचे, तीनशे शब्दांचा निबंध लिहायचा अन्...

IPL 2024 RR vs KKR: कोलकाता-राजस्थान सामन्यावर फिरलं पावसाचं पाणी, सामना करावा लागला रद्द

Pune: नुकतीच 12 वी झालेली, पार्टीसाठी बिल्डर वडिलांची आलिशान गाडी घेतली अन्...; आरोपी तरुणाचा प्रताप समोर

SRH vs PBKS: पंजाबचा शेवटच्या मॅचसाठी ऐतिहासिक निर्णय! आजपर्यंत कोणत्याच संघानं न केलेली गोष्ट करत रचला इतिहास

काय सांगता! एकाच व्यक्तीने केलं 8 वेळा मतदान; व्हिडिओ शेअर करत विरोधकांनी केलाय दावा

SCROLL FOR NEXT