appasaheb dharmadhikari  Sakal Digital
महाराष्ट्र बातम्या

डॉ. अप्पासाहेब धर्माधिकारींच्या नावे बनावट पत्र; पोलिसांत तक्रार दाखल

महाराष्ट्रभूषण डॉ. आप्पासाहेब धर्माधिकारी यांच्या नावे बनावट पत्र खोडसाळपणे समाज माध्यमांमध्ये शनिवारी पसरविण्यात आले आहे.

सकाळ वृत्तसेवा

महाराष्ट्रभूषण डॉ. आप्पासाहेब धर्माधिकारी यांच्या नावे बनावट पत्र खोडसाळपणे समाज माध्यमांमध्ये शनिवारी पसरविण्यात आले आहे.

मुंबई - महाराष्ट्रभूषण डॉ. आप्पासाहेब धर्माधिकारी यांच्या नावे बनावट पत्र खोडसाळपणे समाज माध्यमांमध्ये शनिवारी पसरविण्यात आले आहे. या पत्रातील मजकूर धादांत खोटा असून असून त्याद्वारे महाराष्ट्रातील लोकांची फसवणूक करण्याचा प्रयत्न सुरू असल्याचे ‘साम’ वृत्तवाहिनी आणि ‘सकाळ’ने केलेल्या तपासणीत समोर आले आहे. याप्रकरणी पोलिसांत अज्ञातांविरोधात तक्रार दाखल करण्यात आली आहे.

समाज माध्यमांमध्ये पसरविलेल्या खोट्या पत्राचा वापर करून राजकारण तापविण्याचा खोडसाळपणाचा उद्योग महाराष्ट्रात शनिवारी दिवसभर सुरू झाला. ‘साम’ वृत्तवाहिनी आणि ‘सकाळ’ने मूळ पत्र, बनावट पत्र, त्यातील फॉन्ट, भाषा यांचा अभ्यास केला. विविध समाज माध्यमांवर तपासणी केली. त्यामध्ये हे पत्र बनावट असल्याचे सकृतदर्शनी समोर आले. बदनामीच्या या प्रकरणाची पोलिस कशी दखल घेतात याकडे आता लक्ष आहे.

समाज प्रबोधनकार डॉ. आप्पासाहेब धर्माधिकारी यांनी खारघर येथील कार्यक्रमामध्ये उष्माघाताने मृत झालेल्या नातेवाइकांना सांत्वनपर पत्र १७ एप्रिलला लिहिले होते. त्या पत्राचा वापर निखालस खोट्या पत्रासाठी करण्यात आल्याचे प्राथमिक तपासातून समोर आले. मुळ पत्रात बेकायदेशीरपणे बदल करून ते पत्र जाणीवपूर्वक समाज माध्यमांमध्ये पसरविण्यात आले असल्याचेही उघड झाले. ''फेसबूक''वरील समूहांमध्ये आणि व्हॉटस्अॅपवर हे बनावट पत्र पसरविण्यात आले. समाज प्रबोधनकार डॉ. आप्पासाहेब धर्माधिकारी यांच्याकडे आध्यात्मिक क्षेत्रातील अधिकारी व्यक्ती म्हणून अनेक राजकीय नेते मार्गदर्शनासाठी येतात. ते आध्यात्मिक मार्गदर्शन करतात, तथापि डॉ. आप्पासाहेब धर्माधिकारी यांनी राजकीय क्षेत्रात मार्गदर्शन केलेले नाही. त्यामुळे, पत्रातील आशय बनावट असल्याचे सिद्ध झाले.

महाराष्ट्रभूषण पुरस्कार सोहळा १६ एप्रिलला झाला होता. धर्माधिकारी प्रतिष्ठानच्या कार्यात सहभागी होणाऱ्या लाखो श्रद्धाळू या कार्यक्रमासाठी जमा झाले होते. त्या दिवशी उष्माघाताने १३ लोकांचा मृत्यू झाला होता. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तातडीने श्रीसेवकांच्या कुटुंबीयांची सांत्वनासाठी भेट घेतली होती.

अंधश्रद्धा निर्मूलनात श्रीसेवक

डॉ. आप्पासाहेब धर्माधिकारी आणि धर्माधिकारी प्रतिष्ठान महाराष्ट्रासह देशाच्या आणि जगाच्या विविध भागांमध्ये समाजकार्य करत आहेत. त्यांच्या अनुयायांना श्रीसेवक म्हटले जाते. दर आठवड्याला श्रीसेवक एकत्र जमतात आणि समर्थ रामदासांच्या दासबोधाचे निरूपण सादर केले जाते. श्रीसेवक सामूहिकरीत्या अंधश्रद्धा निर्मुलनासह विविध समाजकार्यात भाग घेतात.

चौकशी सुरू

याप्रकरणी अज्ञात व्यक्तींविरोधात संदीप पाटील यांनी रेवदंडा पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. रेवदंडा पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक देविदास मुपडे यांनी ही तक्रार दाखल करून घेतली. सायबर क्राईम अंतर्गत या प्रकरणाचा शोध घेतला जात असल्याची माहिती रायगडचे अप्पर पोलिस अधिक्षक अतुल झेंडे यांनी दिली. स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे पोलिस निरीक्षक के. टी. गावडे यांच्याकडे पुढील तपास देण्यात आला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ayush Komkar Case: आयुष कोमकर खून प्रकरणात कोर्टामध्ये काय घडलं? बंडू आंदेकरचे पोलिसांवरच आरोप

Pune Traffic Issue : वाहतूक अडथळ्यांच्या कारणांचा अहवाल सादर करा; आयुक्तांचा आदेश

Sachin Yadav: नीरजलाही मागे टाकणारा कोण आहे सचिन यादव? पोलिस भरतीनंतर भालाफेक सोडण्याचा केलेला विचार, पण...

Latest Maharashtra News Updates : प्राध्यापकाने केली विद्यार्थिनीची छेडखानी, तक्रार करुनही कारवाई नाही

Mamata Banerjee: ८४० कैदी तुरुंगातून मुक्त! विधानसभा निवडणुकीपूर्वी ममता बॅनर्जी यांचा निर्णय, नेमकं कारण काय?

SCROLL FOR NEXT