MLA Ashutosh Kale
MLA Ashutosh Kale 
महाराष्ट्र

साई संस्थानच्या अध्यक्षपदी आ. आशुतोष काळे? कोपरगावात जल्लोष

सकाळ डिजिटल टीम

अहमदनगर ः शिर्डी येथील साईबाबा संस्थानच्या अध्यक्षपदी कोपरगावचे आमदार आशुतोष काळे यांची निवड करण्यात आली आहे. राज्य सरकारने शिर्डी संस्थानवर नव्याने विश्वस्त मंडळ नियुक्त केले आहे. रात्री उशिरा या निर्णयाची माहिती नगर जिल्ह्यात समजली. कोपरगावात ही माहिती समजताच काळे यांच्या कार्यकर्त्यांकडून फटाक्यांची आतषबाजी करण्यात आली.(Appointment of Ashutosh Kale as the President of Sai Sansthan)

साई संस्थानचा कारभार सध्या न्यायाधीशांकडे आहे. संस्थानवर स्थानिकांना संधी द्यावी, अशी मागणी करण्यात येत होती. त्यानुसार स्थानिक अध्यक्ष देण्यात आल्याचे समजते. शिर्डी संस्थानवर राष्ट्रवादी काँग्रेसचाच अध्यक्ष होण्याची शक्यता वर्तवली जात होती. त्यानुसार आमदार काळे यांची निवड अपेक्षित मानली जात आहे.

अध्यक्ष पदासाठी राष्ट्रवादीचे कर्जत-जामखेडचे आमदार रोहित पवार, पारनेरचे आमदार नीलेश लंके यांच्या नावाचीही चर्चा होती. काँग्रेसचे आमदार डॉ. सुधीर तांबे यांच्या नावाचीही मागणी होत होती. आमदार काळे हे शेवगावचे माजी आमदार चंद्रशेखर घुले यांचे जावई आहेत. घुले हे जयंत पाटील यांचे मेहुणे आहेत. काळे यांंचे कुटुंब साई संस्थानसोबत पूर्वीपासून निगडित आहे.

आमदार काळे यांची निवड अपेक्षित मानली जात होती. गेल्या चार दिवसांपासून जिल्ह्यात त्यांच्या नावाची चर्चा होती. निवड झाल्याची माहिती समजताच त्यांच्या कार्यकर्त्यांनी फटाक्यांची आषबाजी केली. अध्यक्षपद राष्ट्रवादीकडे गेल्यास काँग्रेसकडे उपाध्यक्षपद जाऊ शकते. त्या नावावर खल सुरू होता. आमदार सुधीर तांबे यांचे नाव उपाध्यक्षपदासाठी आघाडीवर होते. तांबे हे महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांचे मेहुणे आहेत. नवीन विश्वस्त मंडळ निवडीविषयी अधिकृतरित्या समजू शकले नाही.

भारतीय जनता पक्षाने जिल्ह्याबाहेर लोकांना विश्वस्त मंडळात स्थान दिले होते. त्यामुळे शिर्डीकर त्या निर्णयावर नाराज होते. आघाडी सरकारने स्थानिकांना विश्वस्त मंडळात संधी दिल्याचे सांगण्यात येते. (Appointment of Ashutosh Kale as the President of Sai Sansthan)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sushilkumar Shinde : पंतप्रधान नरेंद्र मोदींना सत्तेची चटक;ही निवडणूक हुकूमशाही विरुद्ध लोकशाहीची

Prasad Khandekar: 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम प्रसाद खांडेकरच्या वाढदिवसानिमित्त नम्रता संभेरावची खास पोस्ट; दहा वर्षांपूर्वीचा फोटो शेअर करत म्हणाली...

DY Chandrachud: CJI चंद्रचूड मुलांमधील सायबर गुन्ह्यांबद्दल चिंतित, आंतरराष्ट्रीय सहकार्याचे केले आवाहन

Brittany Lauga: ड्रग्जच्या नशेत ऑस्ट्रेलियन महिला खासदाराचे लैंगिक शोषण, इंस्टाग्राम पोस्टद्वारे व्यक्त केल्या वेदना

ICC ची मोठी घोषणा! महिला T20 World Cup 2024 चे शेड्यूल जाहीर; जाणून घ्या कधी भिडणार भारत-पाकिस्तान

SCROLL FOR NEXT