Jyoti Thakare sakal
महाराष्ट्र बातम्या

'मविआ'ला आणखी एक दणका; ‘मआविम’च्या अध्यक्षा ज्योती ठाकरेंची नियुक्ती रद्द

सत्तांतरानंतर जुन्या सरकारमधील नियुक्त्या रद्द करण्याचा सपाटा अजूनही सुरूच आहे. महिला आर्थिक विकास महामंडळाच्या अध्यक्षा ज्योती ठाकरे यांची नियुक्ती रद्द करण्यात आली

सकाळ वृत्तसेवा

मुंबई : सत्तांतरानंतर जुन्या सरकारमधील नियुक्त्या रद्द करण्याचा सपाटा अजूनही सुरूच आहे. महिला आर्थिक विकास महामंडळाच्या अध्यक्षा ज्योती ठाकरे यांची नियुक्ती रद्द करण्यात आली असल्याचे आदेश आज महिला व बालकल्याण विभागाने दिले आहेत. मात्र महिला आयोग पदाचे अध्यक्षपद हे घटनात्मक पद असल्याने आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर यांनी हे पद सोडण्यास नकार दिल्याने सर्वच पदे रद्द करणे शिंदे - फडणवीस सरकारसाठी अडचणीचे झाले आहे. महाविकास आघाडीच्या अगोदरही भाजप-शिवसेनेचे सरकार सत्तेत असताना २०१८ पासून ज्योती ठाकरे मावीमच्या अध्यक्ष पदावर होत्या. शिंदे-फडणवीस सरकारकडून विशेष करून शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांच्या विविध प्राधिकरणावरील नियुक्त्या रद्द केल्या जात आहेत.

महाविकास आघाडीमध्ये महिला व बालकल्याण विभाग काँग्रेसकडे होता. पक्षाच्या नेत्या यशोमती ठाकूर यांच्याकडे मंत्रिपद होते. तर महिला आर्थिक विकास महामंडळ शिवसेनेकडे होते, ज्योती ठाकरे यांच्याकडे ‘मआविम’चे अध्यक्षपद होते ते आघाडीचे सरकार आल्यानंतर शिवसेनेने कायम ठेवले होते. पण नवनिर्वाचित सरकारने मात्र ही नियुक्ती रद्द केली आहे. त्यांना ३ वर्षे ११ महिन्यांपर्यंत ‘मआविम’चे अध्यपद भूषविता आले. महाविकास आघाडीचे सरकार अचानक कोसळल्यानंतर सत्तेवर आलेल्या शिंदे-फडणवीस सरकारकडून आघाडी सरकारच्या विविध निर्णयांना स्थगितीही दिली जात आहे.

चाकणकर पदावर राहणार

दरम्यान, महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर यांनी हे पद घटनात्मक असल्याने त्याचा कार्यकाळ पूर्ण होईपर्यंत त्यांना कोणी हटवू शकत नसल्याची भूमिका घेतली आहे. त्यामुळे शिवसेनेच्या ज्योती ठाकरे यांना हटविणे सरकारसाठी सोपे झाले असले तरी राष्ट्रवादी काँग्रेसच्या रूपाली चाकणकर यांना बाजूला करण्यात अडचणी येत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

World Heritage status: शिवरायांच्या किल्ल्यांना 'युनेस्को'चा दर्जा मिळण्यास का लागतोय वेळ? गडांच्या व्यवस्थापनावर समितीने ठेवलं बोट

Mumbai News: जैन मंदिरावरील कारवाई योग्यच, उच्च न्यायालयाने ट्रस्टचे अपील फेटाळले

Thane News: ठाण्यात उभी राहणार ग्रीनवॉल! पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी वृक्ष प्राधिकरण विभागाचा निर्णय

Mumbai News: नागरिकांची वाहतूक कोंडीतून होणार सुटका, वेसावे ते भाईंदर कोस्टल रोडच्या कामाला वेग

Latest Maharashtra News Live Updates: देश-विदेशासह राज्यात दिवसभरात काय घडलं? वाचा एका क्लिकवर

SCROLL FOR NEXT