Shivsena Symbol Row
Shivsena Symbol Row  
महाराष्ट्र

Shivsena Symbol Row : शिंदे गटाचा 'हा' युक्तिवाद ठाकरे गटावर भारी! वाचा जेठमलानी काय म्हणाले...

सकाळ डिजिटल टीम

नवी दिल्ली : शिवसेनेच्या दोन गटांतील वादावर आज निवडणूक आयोगात सुनावणी झाली. यावेळी शिंदे गटाचे वकील महेश जेठमलानी यांनी महत्वाचा युक्तिवाद केला. जेठमलानी यांनी २०१८ मध्ये शिवसेनेची घटना ज्या पद्धतीने बदलण्यात आली ती बेकायदेशीर असल्याचा युक्तिवाद यापूर्वी केला होता. एकनाथ शिंदे यांच्याकडे बहुमत असल्याचे शिंदे गटाच्या वतीने सांगण्यात आले होते. (Shivsena Symbol Row)

दरम्यान आजच्या सुनावणीदरम्यान आमच्याकडे संख्याबळ जास्त आहे त्यामुळे पक्ष चिन्हाचा निर्यण तातडीने घ्यावा, असे जेठमलानी यांनी म्हटले आहे. पक्षाचा मोठा गट लोकप्रतिनिधींसोबत बाहेर पडल्यास तो बेकायदेशीर कसा?, असा प्रश्न जेठमलानी यांनी उपस्थित केला आहे. 

शिंदे गटाच्या कागदपत्रांमध्ये त्रुटी असल्याचा आरोप ठाकरे गटाचे वकील कपिल सिब्बल यांनी केला होता. दरम्यान महेश जेठमलानी यांनी हा दावा फेटाळला आहे. कागदत्रांमध्ये कुठलीही त्रुटी नसल्याचे जेठमलानी यांनी स्पष्ट केले. तसेच आमदार आणि खासदार यांचे बहूमत शिंदे गटाकडे आहे, असे जेठमलानी म्हणाले. 

याआधीच्या काही निकालांचा दाखला शिंदे गटाने निवडणूक आयोगात दिला. शिंदे गटाने सादिक अली प्रकरणाचा दाखला आयोगात दिला. धनुष्यबाण चिन्हासाठी बहुमत आवश्यक आहे ते बहुमत शिंदे गटाकडे असल्याचे जेठमलानी म्हणाले. 

कपिल सिब्बल काय म्हणाले -

दरम्यान आजच्या सुनावणीत कपिल सिब्बल यांनी ठाकरे गटाची बाजू मांडली. शिवसेनेतला कोणताही गट नाही तर कपोकल्पित आहे. शिवसेनेतील फूट म्हणजे कल्पना आहे. शिवसेनेत दाखवलेल्या फुटीला काहीही अस्तित्व नाही. उद्धव ठाकरे यांची शिवसेना खरी शिवसेना आहे. शिवसेनतील फुट आयोगाने ग्राह्य धरु नये, असे कपिल सिब्बल म्हणाले.  

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Amit Shah: POK भारताचे आहे अन् आम्ही ते परत घेऊ; अमित शाह यांचा इशारा

Pune Loksabha: धंगेकर की मोहोळ? कँटोन्मेंटमधील 'हे' गणित ठरवणार कोणत्या उमेदवाराला मिळणार आघाडी

Panchayat 3 : वेळेआधीच पंचायत 3 चा ट्रेलर प्रदर्शित; पुन्हा एकदा रंगणार गावकरी आणि सचिवाची जुगलबंदी

Mahadev App: महादेव बेटिंग अ‍ॅपचे पुणे कनेक्शन, व्यापाऱ्यासह 70 जणांना अटक

IPL 2024 : 18 मे रोजी होणारा RCB Vs CSK सामना पावसामुळे रद्द झाला तर… प्लेऑफसाठी कोण ठरणार पात्र?

SCROLL FOR NEXT