River Revitalization 
महाराष्ट्र बातम्या

आर्ट ऑफ लिव्हिंगच्या प्रकल्पामुळे मोठी जलक्रांती ! राज्यातील 18 जिल्ह्यांतील नद्या होताहेत पुनर्जीवित

प्रकाश सनपूरकर

सोलापूर : आर्ट ऑफ लिव्हिंगच्या वतीने महाराष्ट्रामध्ये नदी पुनर्जीवन प्रकल्पांतर्गत मोठ्या प्रमाणात जलक्रांती केली जात आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील नद्यांची क्षेत्रे पुनर्जीवित होऊन जलसंधारण व शेती क्षेत्राला मोठा लाभ मिळण्यास सुरवात झाली आहे. 

महाराष्ट्रामध्ये आर्ट ऑफ लिव्हिंगने मागील काही वर्षांपासून नदी पुनर्जीवन प्रकल्प हाती घेतला आहे. या माध्यमातून नद्यांचा अभ्यास, भौगोलिक स्थिती, नदी पात्रातील भूशास्त्रीय रचना समजून घेत या नद्या पुनर्जीवित व्हाव्यात यासाठी तांत्रिक आराखडा करत प्रकल्पाचे टप्पे निश्‍चित केले जातात. अनेक कारणांनी खंडित झालेले प्रवाह पुन्हा सुरू होत आहेत. त्यामुळे पावसाचे पाणी अधिक प्रमाणात साठवणे व खोलपर्यंत झिरपण्याची प्रक्रिया पूर्ण करत भूजल पातळीत वाढ केली जात आहे. तसेच भूशास्त्रीय अभ्यासाच्या आधारे बांध, बंधारे अशा कृत्रिम रचनाही करण्यात आल्या आहेत. 

या जलक्रांतीचे परिणाम अधिक काळ टिकून राहावेत यासाठी नदी पात्राच्या परिसरात लोकसहभागाने देशी वृक्ष लागवडीला प्राधान्य दिले आहे. या प्रकल्पांमध्ये महाराष्ट्रातील एकूण 18 जिल्हे समाविष्ट आहेत. आतापर्यंत एकूण 32 नद्यांच्या खोऱ्यांमध्ये पुनर्जीवन प्रकल्पाची भूशास्त्रीय अभ्यास करून कामाचे टप्पे निश्‍चित करण्यात आले आहेत. 

दृष्टिक्षेपात कामगिरी 

  • नद्यांची खोरी : 32 
  • काढलेला गाळ : 2 कोटी 35 लाख घनमीटर 
  • झालेला पाणीसाठा : 2 हजार 398 कोटी लिटर 
  • विकसित झालेले क्षेत्रफळ : 31730 हे. 
  • देशी जातीच्या वृक्षांची लागवड : 5 लाख 14 हजार 916 
  • लाभान्वित लोकसंख्या : 20 लाख 
  • एकूण उभारलेल्या जलसंधारण कृत्रिम रचना : 23 हजार 

प्रकल्पात समाविष्ट नद्या 

  • लातूर : मांजरा, तवरजा, घरनी, डाल्टी, कसुरा, जना, मुदगल, रेणा 
  • जालना : दुधना, गलघाटी, घनसावंगी, बिरवी नरोला, विद्रुपा, गोदावरी, सायंजना 
  • जळगाव : वाकी 
  • नाशिक : पझन, वाघाडी, कल्की, शिवंदी 
  • नंदुरबार : गोमाई 
  • नागपूर : वेन्ना 
  • सोलापूर : सीना, भोगावती 
  • सातारा : माणगंगा 
  • उस्मानाबाद : बेनीतुरा, तेरणा, बोरी, भोगावती, हरणा 
  • पुणे : राम नदी, शिवगंगा 
  • अकोला : मोरणा 

पुरस्कार नदी पुनर्जीवनाचे 

  • लिम्का बुक ऑफ रेकार्डस : वर्ष 2019 
  • इंडिया जीओस्पॅटिअल अप्लिकेशन एक्‍सलन्स ऍवॉर्ड 2019 
  • जिओस्पॅटियल वर्ल्ड ऍवॉर्ड फॉर सोशल इम्पॅक्‍ट 2020 
  • महाराष्ट्र शासनाचा महात्मा फुले ऍवॉर्ड फॉर मेकिंग वन ऑफ द बेस्ट वॉटर कन्झर्व्हेशन एफर्टस 
  • महाराष्ट्र नदी प्रकल्पासाठी भारत सरकारच्या वतीने राष्ट्रीय जल पुरस्कार 

आर्ट ऑफ लिव्हिंगच्या नदी पुनर्जीवनाच्या प्रकल्पामध्ये नदीपात्रांचा भूशास्त्रीय अभ्यास करून भूजल पातळी वाढीसाठी आवश्‍यक असलेले उपाय केले जातात. या उपायांमुळे पावसाचे पाणी वाहून जाणे किंवा बाष्पीभवनाला पाणी झिरपण्याचा पर्याय दिला जातो. त्याचा परिणाम भूजल पातळी वाढण्यामध्ये होतो. 
- डॉ. अनिल नारायणपेठकर, 
जिओलॉजिस्ट, आर्ट ऑफ लिव्हिंग नदी पुनर्जीवन प्रकल्प, सोलापूर 

संपादन : श्रीनिवास दुध्याल

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

World Cup 2025: हाच तो क्षण! हरमनप्रीतने टीम इंडियासह उंचावली ट्रॉफी; सेलिब्रेशन अन् स्वप्नपूर्तीचे क्षण, पाहा Video अन् Photo

World Cup 2025: शाब्बास मुलींनो! विराट कोहली, सचिन तेंडुलकरपासून नीरज चोप्रापर्यंत विश्वविजेत्या भारतीय संघावर शुभेच्छांचा वर्षाव

ICC Announced Prize for India : वर्ल्ड कप विजयाची ट्रॉफी अन् कोट्यवधीचं बक्षीस! भारतीय महिला क्रिकेटपटूंसाठी आयसीसीची मोठी घोषणा...

Amol Muzumdar: भारतासाठी खेळण्याची संधी मिळाली नाही, पण आता World Cup विजेता कोच; महिला संघाच्या यशामागचा हिरो

India won Women’s World Cup: दीप्ती शर्माचा वर्ल्ड रेकॉर्ड! भारतीय महिलांनी इतिहास रचला, रोहित शर्मा रडला; Video Viral

SCROLL FOR NEXT