Arvind Kejriwal 
महाराष्ट्र बातम्या

Arvind Kejriwal Latest Update: मोदी सरकारचे फक्त एका माणसासाठी काम; मुंबईतील INDIA बैठकीत केजरीवाल काय म्हणाले?

Sandip Kapde

INDIA Alliance Meeting : इंडिया आघाडीच्या बैठकीचा आज आज अखेरचा दिवस आहे. मोदी सरकारविरोधा भारतातील विरोधी पक्ष एकत्र आले आहेत. मुंबईतील बैठकीत उद्धव ठाकरे आणि काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी अजेंडा सादर केला. या बैठकीत अनेक निर्णय घेण्यात आले. बैठकीनंतर सर्व नेत्यांनी एकत्र पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेत दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी मोदी सरकारवर हल्लाबोल केला.

अरविंद केजरीवाल म्हणाले, देशातील मोदी सरकार सर्वात भ्रष्ट सरकार आहे. हे अहंकारी सरकार आहे. सरकार फक्त एका माणसासाठी करत आहे. इंडिया आघाडी 28 पक्षांची आघाडी नाही तर भारतातील 140 कोटी लोकांची आघाडी आहे. लोक एकत्र येत आहेत. मोदी सरकार स्वतंत्र भारतातील सर्वात भ्रष्ट सरकार आहे.

परदेशातील वृत्तपत्रांमध्ये पहिल्या पानावर बातम्या छापल्या जात आहेत. एका माणसासाठी सरकार काम करत आहेत. एक माणूस देशातील पैसा बाहेर घेऊन जात आहे. यापेक्षा जास्त अहंकारी सरकार झालेलं नाही, असं केजरीवाल म्हणाले.

अरविंद केजरीवाल म्हणाले,  इंडिया आघाडी मोदी सरकारला सत्तेवरुन पायउतार करण्याचे कारण बनेल, असे सर्वांना वाटत आहे. त्यामुळे मोठी शक्ती या आघाडीला तोडण्यासाठी लावली जाईल. आघाडीत भांडण झाल्याच्या बातम्या येत आहेत. मात्र मी जबाबदारीने सांगतो. कुणाचे भांडण नाही. आघाडीत कुणीही पदासाठी आले नाहीत तर देश वाचवण्यासाठी आले आहेत. येणाऱ्या काळात भारत एकत्र येणार आहे. (Latest Marathi News)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ICC Test Ranking मध्ये उलथापालथ! बुमराहचं वर्चस्व संपलं, ऑस्ट्रेलियन दिग्गजाने हिसकावली नंबर-१ची खुर्ची

IND vs SL, 2nd Test, 4th Day: श्रीलंकेला आघाडी घेण्यात यश, पण भारताची सामन्यावर मजबूत पकड; सूरियाबंदाराचं शतक हुकलं

Narali Purnima 2026: नारळी पौर्णिमेच्या दिवशी श्रीफळाचा 'हा' उपाय करा; मनातील २ महत्त्वाच्या इच्छा होतील पूर्ण!

B.Arch Admission Round 3 : बी. आर्किटेक्चर प्रवेश प्रक्रियेची तिसरी यादी जाहीर; ७५८ विद्यार्थ्यांना नवी संधी, ५३६ जणांचे ऑटो फ्रिज प्रवेश निश्चित

विदर्भासह मध्य भारतात पावसाचा अलर्ट; अतिमुसळधार पावसाचा इशारा

SCROLL FOR NEXT