महाराष्ट्र बातम्या

Arvind Sawant : कायद्याच्या कसोटीवर धनुष्यबाण चिन्ह आम्हालाच मिळायला हवं; अरविंद सावंत म्हणाले...

सकाळ डिजिटल टीम

नवी दिल्लीः शिवसेनेचं नाव आणि निवडणूक चिन्ह निवडणूक आयोगाने गोठवलं होतं. त्यावर सुनावण्या झालेल्या असून आज लेखी युक्तीवाद होत आहे. आजच्या युक्तीवादानंतर पुढच्या आठवड्यामध्ये यावर निर्णय येऊ शकतो. त्यापूर्वी आज शिवसेना नेते तथा खासदार अरविंद सावंत यांनी माध्यमांशीव संवाद साधला.

अरविंद सावंत दिल्लीतून बोलत होते. ते म्हणाले की, आम्ही सर्व पुरावे, प्रतिज्ञापत्र आयोगाकडे सादर केले आहेत. आमदार गेले म्हणून पक्षावर हक्क सांगता येत नाही. त्यामुळे आमच्याच बाजूने निकाल लागेल, असं अरविंद सावंत म्हणाले.

हे ही वाचा : T+1 Settlement मुळे वाढेल शेअर बाजारातली उलाढाल

अरविंद सावंत काय म्हणाले?

  • उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वात कार्यरत असलेल्या पक्षाला चिन्ह आणि नाव मिळायला हवं

  • समजा, एखाद्या पक्षात एक आमदार आहे तो जर दुसऱ्या पक्षात गेला तर पक्ष संपला काय?

  • मोठ्या प्रमाणावर सभासद नोंदणी आणि प्रतिज्ञापत्र आम्ही सादर केले आहेत. त्यामुळे आमच्या बाजूने निर्णय लागेल

  • मतदारांनी शिवसेना प्रमुखांच्या शिवसेनेला आणि उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखालील उमेदवारांनी निवडून दिलं आहे

महाशक्ती मागे उभीय म्हणून...

  • शरद यादवांनी लालुप्रसादांच्या मंचावर जावून भाषण केलं. नितीश कुमारांनी पक्षद्रोहाचा मुद्दा पुढे करुन त्यांची खासदारकी रद्द केली होती.

  • शिंदे गटाला पक्ष सोडायचा होता तर त्यांनी राजीनामा देऊन जायला पाहिजे होतं. परंतु ते तसे गेले नाहीत.

  • निवडणूक आयोगात आमच्या वकिलांनी म्हणणं मांडलं असल्याने निर्णय आमच्या बाजूने लागेल

  • मागे महाशक्ती उभीय म्हणून आम्ही काहीही करु शकतो, असं त्यांना वाटतंय. परंतु कायद्याच्या राज्यात न्यायाची अपेक्षा आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

शेगावजवळ ओव्हरहेड केबल तुटल्याने मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत; अमरावती–पुणे एक्स्प्रेससह अनेक गाड्या खोळंबल्या

२०४७ पर्यंत एसटी बसेस १०० टक्के ईव्ही करणार, चार्जिग स्टेशन उभारण्याच्या कामाला गती देण्याचे मुख्यमंत्री फडणवीसांचे निर्देश

Pune News : सुप्रिया सुळेंच्या आरोपांना पोलिस आयुक्तांचे उत्तर! आकडेवारीसह मांडले पुण्याच्या सुरक्षेचे वास्तव

Mumbai T20 League: शाश्वत जगतापचे खणखणीत शतक अन् ईगल ठाणे स्ट्रायकर्सचा बांद्रा ब्लास्टर्सवर दणदणीत विजय

Thane: महावितरणविरोधात आंदोलन अन्‌ राष्ट्रवादी पदाधिकाऱ्यावर गुन्हा; प्रशासनावर नेत्याचा गंभीर आरोप

SCROLL FOR NEXT