Aryan Khan, Sameer Khan Team eSakal
महाराष्ट्र बातम्या

नवाब मलिकांचे जावई समीर खानसह आर्यनला एनसीबीचं समन्स

एनसीबीच्या नव्या पथकाकडून ६ प्रकरणांतील आरोपांना समन्स बजावण्यात आले आहे.

सुधीर काकडे

एनसीबीचे (NCB) झोनल डायरेक्टर समीर वानखेडे (Sameer Wankhede) यांच्यावर झालेल्या गंभीर आरोपांनंतर समीर वानखेडे यांच्याकडे असलेल्या ६ प्रकरणांचा तपास समीर वानखेडे यांच्याकडून काढून घेण्यात आला होता. आपणच ही मागणी केली असून, या प्रकरणाचा तपास एनसीबीच्या दिल्लीच्या पथकाकडे सोपवण्यात आल्याचं समीर वानखेडेंकडून सांगण्यात आलं होतं. एनसीबीच्या विशेष तपास पथकाने (SIT) आता सर्व ६ प्रकरणातील आरोपींना समन्स बजावले आहे. यामध्ये आर्यन खान (Aryan Khan), नवाब मलिक यांचे जावई समीर खान (Sameer Khan) यांच्यासह इतर आरोपींचा देखील समावेश आहे.

राज्याचे अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांनी एनसीबीने केलेल्या कारवाईवर अनेक गंभीर प्रश्न उपस्थित केले होते. समीर वानखेडे यांनी खंडणीसाठी ही सर्व कारवाई ठरवून केल्याचा आरोप देखील मलिक यांनी केला. एकुणच या सर्व प्रकरणात नवाब मलिक यांनी समीर वानखेडेंवर सुरू केलेल्या आरोपांच्या मालिकेनंतर काही दिवसांपूर्वीच या प्रकरणाने एक मोठं वळण घेतलं. एनसीबीचे झोनल डायरेक्टर समीर वानखेडे यांच्याकडे असलेल्या आर्यन खानसह इतर ६ प्रकरणांचा तपास एनसीबीच्या एका दुसऱ्या पथकाकडे देण्यात आला आहे. त्यानुसार आता या पथकाने आर्यन खानला चौकशीसाठी बोलावलं आहे.

नवाब मलिक यांनी आज पत्रकार परिषद घेत नवाब समीर वानखेडे यांच्यावर गंभीर आरोप केले. आर्यन खान हा स्वत: तिकिट विकत घेऊन त्या पार्टीमध्ये गेला नव्हता, तर त्याला प्रतिक गाबा आणि अमीर फर्निचरवाला हे त्या पार्टीत घेऊन गेले होते. त्यानंतर आता एनसीबीने नवाब मलिक यांच्याकडे जर पुरावे असेल तर त्यांनी ते कोर्टात सादर करावे असं आवाहन केलं आहे. तसेच एनसीबीकडून असंही सांगण्यात आलंय की, वानखेडे आणि सॅम डिसोझा यांच्यात संपर्क नव्हता असं इंडिया टुडेच्या वृत्तामधून समोर आलं आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Garden Waste Scam : पुणे महापालिकेच्या उद्यान कचरा प्रकल्पात ३८ कोटींचा गैरव्यवहार? माजी नगरसेवकांचा ठेकेदारावर गंभीर आरोप

Police Negligence: संशयिताऐवजी भलत्यालाच अटक; ज्येष्ठाची ८८ दिवस कारागृहात ससेहोलपट ; राष्ट्रवादीचे प्रवक्ते विकास लवांडे यांचा आरोप

NEET Protest: बिहार सरकार आंदोलकांसमोर झुकलं! गुन्हे मागे घेण्याचा निर्णय, अटकेत असलेल्यांची सुटका

RTE Admissions Probe: आरटीई प्रवेशातील गैरप्रकारांवर सर्वत्र चौकशी; जिल्हा परिषद अध्यक्ष वीरधवल जगदाळे यांची सभेत ग्वाही

Pune HCMTR Ring Road : पुण्यातील वाहतूक प्रकल्पांना गती; एचसीएमटीआर, रिंगरोड व पाताळलोक बोगद्यांसाठी मुख्यमंत्र्यांचे स्पष्ट आदेश

SCROLL FOR NEXT