Aryan Khan
Aryan Khan Sakal media
महाराष्ट्र

Aryan Khan Case : 'एनसीबी'कडून खंडणीखोरी सुरु होती हे आता स्पष्ट; काँग्रेसचा हल्लाबोल

सकाळ डिजिटल टीम

मुंबई : आर्यन खान प्रकरणी नार्कोटिक्स कन्ट्रोल ब्युरोच्या (NCB) विशेष तपास पथकानं (SIT) धक्कादायक खुलासा केला आहे. आर्य़न खानकडं ड्रग्ज नव्हतं, असं एसआयटीनं स्पष्ट केलं आहे. यावरुन आता काँग्रेसनं (Congress) एनसीबीवर निशाणा साधला आहे. एनसीबीकडून खंडणीखोरी सुरु होती हे आता स्पष्ट झालंय, अशा शब्दात काँग्रेसने हल्लाबोल केला आहे. (Aryan Khan Case It is clear that ransom was started from NCB Congress attack)

सावंत यांनी यासंदर्भात ट्विट केलं असून ते म्हणाले, SITनं आर्यन खानकडं ड्रग्ज नव्हते तसेच समीर वानखेडे यांच्या टीमनं छापा टाकताना केलेल्या चुका प्रकाशात आणल्या आहेत. म्हणजेच नवाब मलिक यांनी केलेले आरोपही योग्य होते आणि NCB तर्फे खंडणीखोरी चालू होती हे दखील आता स्पष्ट झालं आहे. NCB Rulebook मधील नियमांचे उल्लंघन दिसत असताना अधिकाऱ्यांवर कारवाई का झाली नाही? असा सवालही त्यांनी केला आहे.

SITच्या अहवालात एनसीबी म्हणते...

एनसीबीच्या सूत्रांनी या अहवालावर प्रतिक्रिया देताना म्हटलं की, या प्रकरणात दोन न्यायालयांनी आरोपींचा जामीन अर्ज फेटाळला होता. त्यामुळं ही कारवाई चुकीची होती असं म्हणता येणार नाही. आता हे प्रकरण न्यायालयात न्यायप्रविष्ठ आहे. तपास अधिकाराशिवाय कोणालाही अटक करण्याचा अधिकार झोनल डायरेक्टरला नाही. नियमांनुसार, कोणत्याही हायप्रोफाईल प्रकरणात छापा टाकल्यानंतर तपास अधिकारी हा संशयित व्यक्तीला अटक करायची की, नाही याचा निर्णय घेतात. परंतू त्याआधी त्यांनी आपल्या अधिक्षकांना ही माहिती द्यावी लागते. अधीक्षक हा झोनल डायरेक्टर यांना माहिती देतो. DDG ना सांगितल्यानंतर सरकारी वकीलांना समजावून सांगितलं जातं. त्यानंतरच DG, NCB ला या कारवाईची माहिती दिली जाते. जेव्हा सर्वांची खात्री होते तेव्हा तपास अधिकाऱ्यांकडून अटकेची कारवाई केली जाते. छापेमारीच्यावेळी व्हिडिओ रेकॉर्डिंग करणं आवश्यक असल्याचं एसओपीत म्हटलेलं नाही. तपास अजूनही सुरूच असून या प्रकरणात तपास अधिकारी आशिष रंजन प्रसाद, व्ही. व्ही. सिंग आणि NCB झोनल डायरेक्टर समीर वानखडे यांचा दोन वेळा जबाब नोंदवण्यात आला आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Latest Marathi News Live Update : योगी आदित्यनाथ यांची काँग्रेसवर टीका; म्हणाले, काँग्रेसची जिझिया कर लावण्याची इच्छा

Virat Kohli : 'खूप फसवणूक झाली मात्र आता...' विराट कसा झाला 634 कोटी रूपयाचा मालक?

Car Maintenance Tips: कारची 'अशी' घ्या काळजी, अन्यथा लागेल गंज

Juice For Diabetes : मधुमेहाच्या रुग्णांनी प्यायलाच हवेत 'हे ज्यूस, रक्तातील साखरेची पातळी राहील नियंत्रणात

Karan Bhushan Singh: ब्रिजभूषण सिंहच्या मुलाच्या प्रचार रॅलीत फायरिंग? चौकशीतून काय समोर आलं?

SCROLL FOR NEXT