Aryan Khan Drugs Case Prabhakar Sail Death e sakal
महाराष्ट्र बातम्या

Aryan Khan Case : समीर वानखेडेंवर आरोप करणारा पंच प्रभाकर साईलचा मृत्यू

सकाळ डिजिटल टीम

मुंबई : कार्डीलिया क्रूझ ड्रग्स (Cruise Drugs Case) प्रकरणातील पंच प्रभाकर साईलचा (Prabhakar Sail Death) मृत्यू झाला आहे. प्रभाकर हा आर्यन खानला अटक केल्यानंतर चर्चेत आलेल्या किरण गोसावीचा बॉडीगार्ड होता. तसेच प्रभाकरने एनसीबीचे तत्कालीन झोनल डायरेक्टर समीर वानखेडेंवर गंभीर आरोप केले होते. प्रभाकरच्या आरोपामुळे खळबळ माजली होती. त्याचा शुक्रवारी दुपारी ह्रदय विकाराच्या धक्क्याने मृत्यू झाल्याची माहिती आहे.

प्रभाकर साईलचा मृतदेह आज सकाळी अंधेरी येथील त्याच्या घरी आणला जाईल. त्यानंतर त्याच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे. याबाबत एबीपी माझाने वृत्त दिले आहे.

कोण होता प्रभाकर साईल? -

आर्यन खानला अटक केल्यानंतर (Aryan Khan Drugs Case) आर्यनसोबत एका व्यक्तीचा फोटो समोर आला होता. ती व्यक्ती म्हणजे किरण गोसावी होती. कार्डिलिया क्रूझ ड्रग्स प्रकरणी किरण गोसावी देखील एनसीबीचा पंच होता. तसेच त्याचा बॉडीगार्ड प्रभाकर साईल देखील एनसीबीचा पंच होता. पण, प्रभाकर साईलने पलटी मारत एनसीबीचे तत्कालीन अधिकारी समीर वानखेडेंवर गंभीर आरोप केले होते.

प्रभाकर साईलच्या आरोपानंतर खळबळ -

आर्यन खानला अटक केल्यानंतर शाहरुख खानला २५ कोटी रुपये मागितले होते. यापैकी ८ कोटी रुपये अंमली पदार्थ नियंत्रण विभागाचे विभागीय संचालक समीर वानखेडेंना देण्यात येणार होते, असा आरोप प्रभाकर साईलने केला होता. महत्वाचं म्हणजे प्रभाकर साईल हा एनसीबीचा पंच होता. त्याने आर्यन खान ड्रग्स प्रकरणात साक्ष दिली होती. पण, साक्ष नोंदवताना कोऱ्या कागदावर सही घेण्यात आली, असा गंभीर आरोप देखील त्याने केला होता. त्यानंतर एनसीबीच्या कारवाईवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT