fadnvis 
महाराष्ट्र बातम्या

"नवी प्रकरणं बाहेर येताहेत म्हणून सरकार अधिवेशनापासून पळतंय"

Amit Ujagare (अमित उजागरे)

मुंबई : राज्य शासनातील रोज नवंनवी प्रकरणं बाहेर येत आहेत त्यामुळे सरकार अधिवेशनापासून पळ काढत आहे, असा आरोप विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे. उद्यापासून राज्याचं दोन दिवसीय पावसाळी अधिवेशन सुरु होत आहे. याच्या पूर्वसंध्येला फडणवीस यांनी पत्रकार परिषद घेऊन सरकारला धारेवर धरलं. (as new cases are coming out state gov is running away from the convention says Fadnavis)

फडणवीस म्हणाले, राज्यातल्या विविध खात्यात होणाऱ्या भ्रष्टाचारावर आम्ही बोलूच नयेत अशी यंदाच्या अधिवेशनाची रचना करण्यात आली आहे. पण आम्ही हा निर्णय केला आहे की, सभागृहात जे असेल ते मांडायचा प्रयत्न करु. जे मांडू दिलं जाणार नाही, ते आम्ही रस्त्यावर येऊन, जनतेत जाऊन मांडू.

...तर आम्ही रस्त्यावर उतरल्यास विचारु नका

कोरोनाच्या नावावर अधिवेशन संपवलं जातं, पण बाकी इतर सर्व गोष्टी सुरु आहेत. अशा प्रकारे लोकशाहीची थट्टा बंद केली पाहिजे. आम्हाला जनतेचे प्रश्न सभागृहात मांडू दिले जाणार नसतील तर उद्या आम्ही रस्त्यावर उतरुन आंदोलन केलं तर ते कशासाठी करता हे आम्हाला कोणी विचारु नये. सरकारद्वारे अधिवेशनाच्या सर्व प्रमुख परंपरा पायदळी तुडवल्या जात आहेत.

सरकारमधील विसंवादामुळं अध्यक्षांची निवड रखडली

त्याचबरोबर राज्यातील सध्याच्या परिस्थितीनुसार अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर विधानसभा अध्यक्षांची निवड केली जाईल असं दिसत नाही. तीन पक्षांमध्ये कुठलंही एकमत नाही, आमचं स्पष्ट मत होत की तुमच्याकडे बहुमत आहे ना मग हे पद भरलं गेलं पाहिजे. सरकारमधील विसंवादातून ही परिस्थिती निर्माण झाली आहे, असा आरोपही यावेळी फडणवीस यांनी केला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Eknath Shinde: पुण्यात 'जय गुजरात'ची घोषणा; मुंबईत सारवासारव, अमित शहांसमोर दिलेल्या नाऱ्यावर एकनाथ शिंदेंची प्रतिक्रिया

MP Naresh Mhaske : अर्बन नक्षल घुसखोरीवरून पुरोगामी नेत्यांची कोल्हेकुई; नरेश म्हस्केंची घणाघाती टीका

Loan Penalty: आरबीआयकडून मोठा दिलासा! आता कर्जाच्या प्री-पेमेंटवर दंड भरावा लागणार नाही, नियम कधीपासून लागू होणार?

Georai Crime : गायरान जमिन का कसता? असे म्हणून अदिवासी कुटुंबीयाना कु-हाडीने मारहाण; वडिलांसह माय-लेकी गंभीर जखमी

Latest Maharashtra News Updates : - जाहीर केलेले ११६० कोटी देऊन शाळांना टप्पा वाढ द्यावी

SCROLL FOR NEXT