Asaduddin Owaisi expressed his views on the situation in the state
Asaduddin Owaisi expressed his views on the situation in the state Asaduddin Owaisi expressed his views on the situation in the state
महाराष्ट्र

असदुद्दीन ओवैसींच्या मते महाराष्ट्रात सुरू आहे मर्कटनृत्य; आम्ही...

सकाळ डिजिटल टीम

मुंबई : महाराष्ट्रातील राजकीय घडामोडींवर लक्ष आहे. ते माकडांसारखे वागत आहे. माकडांचा डांस सुरू आहे. एका झाडावरून दुसऱ्या झाडावर उडी मारत आहे. एका पक्षातून दुसऱ्या पक्षात जात आहे. लोकांचे घर जळत असल्याचे दिसत आहे. आमच्याकडून हे पाहत होत नाही. मात्र, पाहव लागत आहे. कारण, हा महाविकास आघाडीचा (maha vikas aghadi) घरचा प्रश्न आहे. आम्ही यात काहीही करून शकत नाही, असे एमआयएमचे अध्यक्ष व खासदार असदुद्दीन ओवैसी (Asaduddin Owaisi) म्हणाले. (Asaduddin Owaisi expressed his views on the situation in the state)

शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे यांनी बंड पुकारल्यानंतर राजकीय वातावरण चांगलेच बिघडले आहे. एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करीत आहे. पाहून घेण्याची धमकी दिली जात आहे. अद्याप हे प्रकरण शांत झालेले नाही. यामुळे राज्यातील वातावरण चांगलेच बिघडले आहे. आम्ही हे शांतपणे पाहत आहोत. कारण हा आमचा विषय नाही, असेही असदुद्दीन ओवैसी म्हणाले.

राज्यात सुरू असलेला प्रकार हा महाविकास आघाडी (maha vikas aghadi) यांचा अंतर्गत प्रश्न आहे. यात आम्ही काही करून शकत नाही. आम्ही लहान आहोत. आमचा पक्ष लहान आहे. मात्र, माझी भूमिका मोठी ठरणार आहे. राज्यात सुरू असलेल्या प्रकारावर मला काहीही बोलायचे नाही, असेही असदुद्दीन ओवैसी (Asaduddin Owaisi) म्हणाले.

काय करावे आणि काय करू नये हे महाविकास आघाडीने ठरवावे

शिवसेनेचे (shiv sena) नेते व खासदार संजय राऊत यांनी सुरू असलेल्या प्रकरणानंतर रस्त्‍यावर उतरून आंदोलन करणार असल्याचे म्हटले होते. त्यांनी रस्त्यावर यायला पाहिजे. हा त्यांचा प्रश्न आहे. याला मी काही करू शकत नाही. काय करावे आणि काय करू नये हे महाविकास आघाडीने ठरवावे. याचे आम्हाला काहीही करायचे नाही, असेही असदुद्दीन ओवैसी (Asaduddin Owaisi) म्हणाले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Crime News: सलमान खान गोळीबार प्रकरणी दोघांना ३० एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी

Sankarshan Karhale: "उद्धव ठाकरेंचा फोन आला अन् राज ठाकरेंनी घरी बोलवलं"; राजकारणावरील कविता सादर केल्यानंतर काय-काय झालं? संकर्षणनं सांगितलं

Pune Loksabha : पंतप्रधान मोदींची उद्या पुण्यात सभा ; सुमारे दोन लाख नागरिक उपस्‍थित राहणार,भाजपचा दावा

IPL, LSG vs RR: संघाचा विजय, पोराची पहिली फिफ्टी अन् कुटुंबाचं सेलिब्रेशन; पाहा राजस्थानच्या जुरेलचा स्पेशल Video

Latest Marathi News Live Update: पंतप्रधान मोदींची उद्या पुण्यात सभा; सुमारे दोन लाख नागरिक उपस्‍थित राहणार

SCROLL FOR NEXT