Ashadhi Ekadashi 2022 sakal
महाराष्ट्र बातम्या

Ashadhi Ekadashi 2023: पंढरपुरात राजकीय नेत्यांचे नको, वारकऱ्यांच्या स्वागताचे फलक लावा - मुख्यमंत्री

सर्वच राजकीय पक्षांना त्यांच्या नेत्यांना आणि कार्यकर्त्यांना CM शिंदे यांनी आवाहन केलं आहे.

Amit Ujagare (अमित उजागरे)

मुंबई : येत्या गुरुवारी २९ जून रोजी आषाढी एकादशीनिमित्त लाखो वारकरी विठुरायाच्या दर्शनासाठी पंढरपुरात दाखल होणार आहेत. यापार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सर्वच राजकीय पक्षांना आणि त्यांच्या कार्यकर्त्यांना एक महत्वाचं आवाहन केलं. पंढरपुरात राजकीय नेत्यांऐवजी वारकऱ्यांच्या स्वागताचे फलक लावावेत असं त्यांनी म्हटलं आहे. (Ashadhi Ekadashi 2023 dont want to put up Political leaders boards in Pandharpur says CM Eknath Shinde)

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नुकतीच पंढरपुरला आढावा भेट दिली. यावेळी एकादशीनिमित्त इथली व्यवस्था कशी असेल याची पाहणी केली. यावेळी पंढरपुरमध्ये मोठ्या प्रमाणावर विविध पक्षांचे बॅनर्स लागल्याचं दिसून आलं. हे विद्रुपीकरण पाहुन ते काहीसे व्यथीत झाले. (Latest Marathi News)

दरम्यान, मुख्यंमत्र्यांनी या अनुषंगानं जिल्हा प्रशासनाला काही सूचना केल्या. यामध्ये राज्यभरातून लाखो वारकरी भाविक पंढरपुरात दाखल होणार आहेत. विठ्ठल आणि रखुमाई हे त्यांचे श्रद्धास्थान आहे, त्यामुळं त्यांच्या स्वागतासाठीचे फलकच इथं लागायला हवेत असं त्यांनी प्रशासनाला सुचवलं. (Marathi Tajya Batmya)

आषाढी वारीच्या समन्वयाची जबाबादारी दोन मंत्र्यांकडं

आषाढी वारीच्या संपूर्ण कार्यक्रमाची जबाबदारी मुख्यमंत्र्यांनी दोन मंत्र्यांवर सोपवली आहे. आरोग्य मंत्री तानाजी सावंत आणि ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन हे यामध्ये समन्वयक म्हणून काम पाहणार आहेत. यामध्ये वारकऱ्यांच्या तसेच भाविकांच्या सोयीसुविधा, गर्दी नियंत्रण तसेच वाहतुक व्यवस्था या सर्व व्यवस्थांचा समावेश असेल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Video : पाठीमागून गपचूप आला मिठी मारली अन् छातीवर...; रस्त्यावर महिलेसोबत अश्लील कृत्य, धक्कादायक घटनेचे फुटेज व्हायरल, पाहा व्हिडीओ

Latest Maharashtra News Updates Live : वांगणी रेल्वे फाटक रस्त्याची दुरवस्था, खड्ड्यामुळे वाहन चालवणंही कठीण

Uttarkashi Cloudburst: उत्तरकाशीत ढगफुटीमुळे पूर, मलब्याने घरे उद्ध्वस्त! अनेक लोक अडकल्याची भीती; बचावकार्य सुरू...

राजा रघुवंशीच्या दारात कडेवर बाळ घेऊन पोहोचली महिला; DNA रिपोर्टच्या दाव्यामुळे उडाली खळबळ, तिच्याकडे असा कोणता पुरावा आहे?

Pune Traffic: वाहतूक कोंडीत गुदमरतोय रहिवाशांचा जीव; केशवनगर, मुंढव्यातील गंभीर स्थिती, वाहनांच्या वाढत्या संख्येमुळे भर

SCROLL FOR NEXT