Ashadhi Ekadashi esakal
महाराष्ट्र बातम्या

Ashadhi Ekadashi : CM शिंदे सहकुटुंब शासकीय महापूजेला हजर राहणार; किती वाजता असणार पूजा? जाणून घ्या शेड्यूल

आषाढी एकादशी उद्या (गुरुवार) 29 जून 2023 रोजी साजरी होत आहे.

सकाळ डिजिटल टीम

शासकीय पुजेच्या निमित्तानं मुख्यमंत्री विठ्ठलाला काय साकडं घालतात, याकडं संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागलं आहे.

Ashadhi Ekadashi 2023 : आषाढी एकादशी उद्या (गुरुवार) 29 जून 2023 रोजी साजरी होत आहे. दोन्ही संतांच्या पालख्या सोलापूर जिल्ह्यात दाखल झाल्या असून आज (बुधवार) 28 जून रोजी पंढरपूर शहरात दाखल होतील.

त्यानंतर मुख्यमंत्री हे सहकुटुंब शासकीय महापूजेसाठी हजर राहतील, असं सांगण्यात आलं आहे. सध्या आषाढी वारीच्या निमित्तानं महाराष्ट्रासह अन्य राज्यातील भाविक पंढरपुरात दाखल होऊ लागले आहेत. दर्शनरांगेतील भाविकांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज दुपारी 2 वाजता सोलापूरसाठी सह्याद्री अतिथीगृहावरून निघतील. त्यानंतर दुपारी 4:30 वाजता 'पर्यावरणाची वारी पंढरीच्या दारी' या जनजागृती उपक्रमाच्या समारोप सोहळ्याला उपस्थितीत राहतील.

आज 5 वाजता सोलापूर वन विभागानं तयार केलेल्या काॅफिटल बुकचं अनावरण आहे. त्यानंतर मुख्यमंत्री पंढरपूरकडं प्रस्थान करतील. 5:15 वाजता आषाढी यात्रा स्वच्छता दिंडीचा समारोप सोहळा होणार आहे.

29 जून रोजी मध्यरात्री 2:30 वाजता विठ्ठल-रुक्मिणी मंदिरात पूजा होणार आहे. ती पहाटे 4 पर्यंत चालणार आहे. या शासकीय महापूजेसाठी मुख्यमंत्री सहकुटुंब हजर राहतील, असं सांगण्यात येत आहे. मुख्यमंत्र्यांचा असा दोन दिवसीय सोलापूर दौरा असणार आहे. या शासकीय पुजेच्या निमित्तानं मुख्यमंत्री विठ्ठलाला काय साकडं घालतात, याकडं संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागलं आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

World Record: साई सुदर्शनचा विश्वविक्रम! IPL 2026 मध्ये ऑरेंज कॅपही मिळवली अन् T20 मध्ये भल्याभल्यांना जे जमलं नाही, ते करून दाखवलं

KKR vs GT, IPL Points Table: शुभमन गिलचं शतक हुकलं अन् कोलकाताने रोखला गुजरातचा विजयरथ! KKR चं प्लेऑफचं आव्हान जिवंत

NEET पेपर लीकनंतर NTAमध्ये मोठा प्रशासकीय फेरबदल! दोन वरिष्ठ अधिकाऱ्यांची नियुक्ती; सरकारचं निर्णायक पाऊल

१० संघ अन् १३ शतकं... IPL च्या १९ वर्षांच्या इतिहासात याआधी जे कधीच घडलं नव्हतं ते यंदा घडलंय!

केंद्रीय मंत्र्याच्या मुलाला पोक्सो अंतर्गत दाखल गुन्ह्यात अटक; १७ वर्षीय मुलीला लग्नाचं आमिष दाखवून ठेवले संबंध

SCROLL FOR NEXT