महाराष्ट्र

महापूजेच्या मानानंतर जिजाबाई भावूक; विठ्ठलाला साद घालत म्हणाल्या, 'फक्त..'

धनश्री ओतारी

एकनाथ शिंदेंना आपल्या राजकीय कारकिर्दीमध्ये पहिल्यांदाच महापूजेचा बहुमान मिळाला. मुख्यमंत्र्यांसोबत गेवराई (ता. बीड) च्या नवले दाम्पत्याला शासकीय महापूजेचा मान मिळाला. शासकीय महापूजा संपन्न झाल्यानंतर ‘मानाचा वारकरी’ सन्मान मिळालेल्या जिजाबाई नवलेंनी माध्यामांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी विठ्ठलकडे जे मागणे केले ते सध्या चर्चेत आले आहे.(ashadhi ekadashi manacha warakari couple jijabai nawale wish at vitthal)

आषाढी एकादशी निमित्त मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, त्यांच्या पत्नी लता शिंदे यांच्या हस्ते श्री विठ्ठल रुक्मिणीची शासकीय महापूजा करण्यात आली. मुरली भगवान नवले (वय ५२) व जिजाबाई मुरली नवले (४७) यांनी शासकीय महापूजा मुख्यमंत्री शिंदे यांच्यासोबत केली.

शासकीय महापूजा संपन्न झाल्यानंतर जिजाबाई नवलेंनी माध्यामांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी विठ्ठलाकडे काय मागणं केलं असा सवाल करण्यात आला. यावेळी, “माझे पाय चांगले राहू दे! अशी मागणी केली. म्हणजे पुढच्या वर्षी पुन्हा वारीला येता येईल.” अशी भावना जिजाबाई नवलेंनी व्यक्त केली.

‘मानाचा वारकरी’ सन्मान मिळालेले मुरली बबन नवले हे गेल्या ३०-३५ वर्षांपासून म्हणजेच लग्नाआधीपासून वारी करत आहेत. पण जिजाबाई यांचं हे वारीचं दुसरंच वर्ष आहे. त्यांचे पती मागील १२ वर्षांपासून संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीसोबत पायी चालत विठुरायाच्या दर्शनाला येत आहेत. नवले दाम्पत्य हे बीड जिल्ह्याच्या गेवराई तालुक्यातील रूई येथील रहिवासी आहे. शेती हा त्यांचा मुख्य व्यवसाय असून मुरली नवले हे १९८७ पासून न चुकता वारीला येतात.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pakistan Cricket Team : जिंकलेत आयर्लंडविरूद्ध अन् म्हणे पाकिस्तान जगातील सर्वोत्तम संघ... PCB च्या नक्वींनी कळसच गाठला

Pune Traffic : मेट्रोच्या कामामुळे सिमला ऑफिस चौकाजवळ वाहतुकीत बदल

PM Modi Mumbai roadshow : ''जुने रेकॉर्ड तोडणार'' मोदींच्या मुंबईतील 'रोड शो'ला तुफान प्रतिसाद; पंतप्रधान म्हणाले...

IPL 2024 RR vs PBKS Live Score: आवेशने एकाच ओव्हरमध्ये पंजाबला दिले दुहेरी धक्के! धोकादायक रुसो पाठोपाठ शशांक सिंगही परतला माघारी

Pune Crime News : महादेव ॲपद्वारे ऑनलाइन सट्टा चालविणाऱ्या कॉल सेंटरवर छापा

SCROLL FOR NEXT