Ashish Deshmukh will soon leave the Congress and join the NCP esakal
महाराष्ट्र बातम्या

Congress Leader: राष्ट्रवादीचा दे धक्का! काँग्रेसचा बडा नेता NCPच्या वाटेवर, मेळावा घेत करणार प्रवेश?

रुपेश नामदास

काँग्रेसमध्ये अंतर्गत धुसफूस आता चव्हाट्यावर यायला लागली आहे. कारण काँग्रेस नेते आशिष देशमुख हे गेल्या दोन दिवसांपासून प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्यावर गंभीर आरोप करत आहेत. मात्र आशिष देशमुख लवकरच काँग्रेसला राम राम करत राष्ट्रवादीमध्ये प्रवेश करणार असल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे. (Ashish Deshmukh will soon leave the Congress and join the NCP)

काँग्रेस नेते आशिष देशमुख लवकरच नागपुरमध्ये राष्ट्रवादीचा मेळावा घेणार असल्याची माहिती मिळत आहे. तसेच या मेळाव्यासाठी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आणि विरोधी पक्ष नेते अजित पवार देखील उपस्थित राहणार आहेत.

हिंगणा मतदार संघामध्ये हा मेळावा घेणार आहेत. तसेच राष्ट्रवादीच्या ताब्यात असलेल्या हिंगणा मतदार संघातून निवडणूक लढण्याची त्यांची इच्छा आहे. काँग्रेस पक्षावर आणि पक्षातील नेत्यांवर वारंवार देशमुख टीका करत आहेत.

अशात त्यांच्यांवर कारवाईची दाट शक्यता आहे. त्यामुळे ते राष्ट्रवादीच्या संर्पकात आहेत. मागील काही दिवसांपुर्वी त्यांनी अजित पवार आणि शरद पवार यांची भेट घेतली होती. त्यामुळे काय होत हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

दरम्यान आशिष देशमुख सतत नाना पटोले यांच्यावर गंभीर स्वरूपाचे आरोप करत आहेत. आज देखील माध्यमांशी बोलतांना त्यांनी नाना पटोले यांच्यावर टीका केली, ते म्हणाले नाना पटोले येत्या काळातील निवडणुका स्वबळावर लढणाची तयारी करत आहे. ते वेगळी चूल मांडण्याच्या तयारीत आहे.

tv9 मराठीच्या वृत्तानुसार..

हेही वाचा- सामान्यांचा पैसा सुरक्षित ठेवण्यासाठीच Virtual Currency करकक्षेत

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pakistan Cricket : पाकिस्तानची संगीत खुर्ची! मोहम्मद रिझवानचा 'करेक्ट कार्यक्रम' करून २५ वर्षीय खेळाडूला केलं कॅप्टन

Kolhapur CBS Rada : कोल्हापूर सीबीएसवर एसटी नसल्याने प्रवासी संतापले, जोरदार घोषणाबाजी; नेमकं काय प्रकरण

'गुप्तांगाला स्पर्श करणेही बलात्कारच'; मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाचा महत्त्वाचा निर्णय; ड्रायव्हरने दोन मुलींवर केला होता अत्याचार

Ichalkaranji Politics : निमित्त दिवाळी शुभेच्छा, कोल्हापूरचे दादा, इचलकरंजीच्या आण्णांना भेटले; मिशन झेडपी ते महापालिका काय झाली चर्चा...

SLW vs BANW: २ धावांत ५ विकेट्स पडल्या अन् बांगलादेशने हातचा सामना गमावला; श्रीलंकेने विजयासह आव्हान कायम राखले

SCROLL FOR NEXT