Ashish Shelar Latest News Ashish Shelar Latest News
महाराष्ट्र बातम्या

BJP State President : आशिष शेलार होणार भाजपचे प्रदेशाध्यक्ष; सूत्रांची माहिती

भाजपकडून प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांना मंत्रिमंडळात संधी देण्यात येणार आहे

सकाळ डिजिटल टीम

Ashish Shelar Latest News मुंबई : महाराष्ट्र मंत्रिमंडळाचा विस्तार मंगळवारी (ता. ८) होणार आहे. यावेळी भाजपकडून दहा ते बारा मंत्री शपथ घेणार असल्याची माहिती. तसेच शिंदे गटाकडून सहा ते सात मंत्री शपथ घेऊ शकतात. भाजपकडून प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांना मंत्रिमंडळात संधी देण्यात येणार आहे. यामुळे पुढील प्रदेशाध्यक्ष कोण होणार, असा प्रश्न उपस्थित करण्यात येत आहे. प्रदेशाध्यक्षपदासाठी आशिष शेलार (Ashish Shelar) यांचे नाव आघाडीवर असल्याची माहिती सूत्रांकडून प्राप्त झाली आहे.

अनेक नाट्यमय घडामोडीनंतर मंगळवारी मंत्रिमंडळाचा विस्तार होणार आहे. पहिल्या टप्प्यात ज्या मंत्र्यांना मंत्रिमंडळात स्थान देण्यात येणार आहेत, त्यांना पक्षाकडून फोन करण्यात आल्याची माहिती आहे. या मंत्र्यांमध्ये भाजपचे (BJP) प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांच्या नावाचाही समावेश आहे. पाटलांना मंत्री केल्यास पुढचा प्रदेशाध्यक्ष भाजपला निवडावा लागणार आहे.

३० जून रोजी शिंदे-फडणवीस यांचे सरकार स्थापन झाले. आज या घटनेला दीड महिना होत आहे. मात्र, महाराष्‍ट्रात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असे दोनच मंत्री आहे. यामुळे विस्तार कधी होणार, असा प्रश्न सातत्याने विचारला जात होता. आता दिवस, वेळ ही ठरला आहे. तसेच काही मंत्र्यांची निवडही करण्यात आली आहे. यामुळे उद्या विस्तार होईलच, हे पक्के झाले आहे.

चंद्रकांत पाटील मंत्री झाल्यास आशिष शेलार यांच्याकडे प्रदेशाध्यक्षपदाची जबाबदारी सोपवली जाण्याची शक्यता सूत्रांकडून वर्तवली जात आहे. महापालिका निवडणुका, लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुका लक्षात घेऊन शेलारांकडे (Ashish Shelar) प्रदेशाध्यक्षपदाची जबाबदारी सोपवली जाण्याची शक्यता आहे. त्यांना मंत्री करण्यात येणार नसल्याने मोठी जबाबदारी देण्यात येणार असल्याची माहिती आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT