Ashish Shelar On Sanjay Raut Letter Team eSakal
महाराष्ट्र बातम्या

Ashish Shelar : आंबेडकरांच्या जन्मस्थळाचा वाद निर्माण करण्याचा ठाकरे गटाचा प्रयत्न; शेलारांची राऊतांवर सडकून टीका

''बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्म महाराष्ट्रात झाला'' असं संजय राऊत म्हणाले आहेत.

सकाळ डिजिटल टीम

''बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्म महाराष्ट्रात झाला'' असं संजय राऊत म्हणाले आहेत.

मुंबई : राज्यात महारापुरुषांबाबत अवमानाचा मुद्दा चांगलाच तापला आहे. भाजपच्या अनेक नेत्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांपासून ते महात्मा ज्योतिबा फुले अशा अनेक महापुरुषांबद्दल वादग्रस्त वक्तव्य केलंय. यावरुन महाविकास आघाडीच्या नेत्यांनी सरकार आणि भाजपविरोधात रान उठवलं आहे.

मात्र, अशातच आता खुद्द शिवसेनेचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनीच एक वादग्रस्त वक्तव्य केलंय. ''बाबासाहेब आंबेडकर (Babasaheb Ambedkar) यांचा जन्म महाराष्ट्रात झाला'' असं संजय राऊत म्हणाले आहेत. मुळात डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा जन्म हा महाराष्ट्रात झाला नसून त्यांच्या जन्म मध्य प्रदेश राज्यातील महू या गावात झाला आहे. त्यामुळं राऊतांनी केलेल्या खोट्या दाव्यामुळं विरोधकांनी राऊतांविरोधात रान उठवलं आहे. राऊतांच्या वादग्रस्त वक्तव्यावर भाष्य करतान मुंबई भाजप अध्यक्ष आशिष शेलार यांनी त्यांचा चांगलाच समाचार घेतला.

माध्यमांशी बोलताना आशिष शेलार (Ashish Shelar) म्हणाले, 'संजय राऊतांना डाॅ. आंबेडकरांवरची दोन पुस्तकं भेट म्हणून पाठवली आहेत. त्यांनी आंबेडकरांचा संपूर्ण अभ्यास करावा आणि मगच अशी वक्तव्य करावीत. बाबासाहेब आंबेडकरांच्या जन्मस्थळाचा वाद निर्माण करण्याचा प्रयत्न ठाकरे गटाकडून सुरु आहे. ते जाणीवपूर्वक वाद निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहे. राऊतांकडून आंबेडकरांबाबत खोटी माहिती पसरवली जात आहे.'

राऊत अज्ञान पाजळण्याची एकही संधी सोडत नाहीत. राऊतांकडून नवीन इतिहास लिहिण्याचा प्रयत्न सुरु आहे. ठाकरे गटाकडून हिंदू देव-देवतांची टिंगल टवाळी केली जात आहे. दलित समाजाला आंबेडकरांनी आवाज दिला, त्यांच्याबद्दल अशी वक्तव्य केली जाताहेत, हे दुर्दैव आहे. महापुरुषांबद्दल बोलायला यांची हिंमत कशी होते. याप्रकरणी आता राऊत कधी माफी मागणार? असा सवाल शेलार यांनी केलाय. आंबेडकरांचा जन्म महाराष्ट्रात झाल्याचा उल्लेख राऊतांनी केला होता, त्याला शेलार यांनी सडेतोड उत्तर दिलं आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Ganeshotsav Traffic Rules: गणेशोत्सवात पुणे मध्यवर्ती भागातील हलक्या मालवाहू वाहनांना पहाटे २ ते सकाळी ११ पर्यंतच लोडिंग-अनलोडिंगची मुभा

Education Alert: शिक्षकांच्या आंदोलनामुळे शाळा बंद राहू नयेत; आरोग्य, बाल विकास, ग्रामपंचायत विभागाला सूचना

1980s AI Photo Trend: ChatGPT वरील एक फोटो पर्यावरणाला पडतोय महागात? व्हायरल AI फोटो 'ट्रेंड'मागचं धक्कादायक वास्तव

VARUN CHAKRAVARTHY: अफगाणिस्तानविरुद्ध भारताच्या विजयाला मोठं ग्रहण! वरुण चक्रवर्ती मालिकेतून बाहेर; एशियन गेम्सही मुकण्याची शक्यता

Road Accident: पोळ रांजणगावजवळ भीषण अपघात; अज्ञात वाहनाच्या धडकेत लासूरगावच्या २५ वर्षीय तरुणाचा मृत्यू

SCROLL FOR NEXT