MLA Ashish Shelar e sakal
महाराष्ट्र बातम्या

गुन्हा रद्द करण्यासाठी आशिष शेलारांची उच्च न्यायालयात धाव

सकाळ डिजिटल टीम

मुंबई : महापौर किशोरी पेडणेकर (Mumbai Mayor Kishori Pednekar) यांच्याबद्दल आक्षेपार्ह विधान केल्यामुळे आशिष शेलार (BJP MLA Ashish Shelar) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यांना अटी-शर्तीसह जामीन मंजूर झाला आहे. मात्र, आशिष शेलार यांनी हा फौजदारी गुन्हा रद्द करण्यासाठी मुंबई उच्च न्यायालयात (Bombay High Court) धाव घेतली आहे.

गेल्या आठवड्यात मुंबईत वरळीला एका घरात गॅस सिलेंडरचा स्फोट झाला होता. त्यामध्ये कुटुंबातील तिघांचा मृत्यू झाला होता. त्यानंतर जवळपास तीन दिवसांनी महापौर रुग्णालयात त्यांची भेट घेण्यासाठी गेल्या होत्या. त्यावरुन आशिष शेलार यांनी पत्रकार घेतली होती. त्यात त्यांनी किशोरी पेडणेकर यांच्याबाबत आक्षेपार्ह विधान केले होते, असा आरोप महापौरांनी केला आहे. याबाबत पेडणेकर यांनी थेट गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांना पत्र लिहून गुन्हा दाखल करण्याची मागणी केली होती. त्यांनी मुंबईच्या नरिमन पाईंट पोलिस ठाण्यात तक्रार देखील दाखल केली होती. त्यावरून आशिष शेलारांवर भादंवि कलम 354,509 नुसार विनयभंग असा गुन्हा मरीन ड्राईव्ह पोलिस दाखल करण्यात आला आहे.

आज शेलारांनी पोलिस ठाण्यात जाऊन जबाब नोंदवला. त्यानंतर त्यांना अटी-शर्तीसह जामीन मंजूर झाला. तसेच त्यांनी भाजपवर टीका देखील केली. याच मुद्द्यावर भाजपचे कार्यकर्ते देखील आक्रमक झाल्याचे पाहायला मिळाले. आता त्यांच्याविरोधातील गुन्हा रद्द व्हावा यासाठी त्यांनी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Rain Update: महाराष्ट्रात धोक्याची घंटा! पुढील २४ तासांत ३१ जिल्ह्यांना वादळ-पावसाचा तडाखा, IMD चा मोठा इशारा

Laxman Hake:सातारा झेडपी अध्यक्षपदी ओबीसींना डावलले: ओबीसी नेते लक्ष्मण हाके; दोन सप्टेंबरचा अध्यादेश बेकायदा, मराठ्यांनी हक्क हिरावला!

Nagpur News: सिलिंडर साठी ग्राहकांचा उन्हात संघर्ष; वानाडोंगरीत लांबच लांब रांगा ; घरपोच सेवा बंद झाल्याने संताप

Nagpur News: विदर्भाच्या ‘कॅलिफोर्निया’त उष्णतेचा तडाखा; आंबिया बहराला गळती : संत्री-मोसंबी उत्पादन घटण्याची शक्यता

Latest Marathi News Live Update : पुढील चार दिवस राज्यात मेघ गर्जनेसह पावसाची शक्यता

SCROLL FOR NEXT