Ashok Chavan
Ashok Chavan sakal
महाराष्ट्र

मराठा समन्वयकांसोबत बैठक; अशोक चव्हाण म्हणाले...

दत्ता लवांडे

नवी मुंबई : आज राज्य मंत्रीमंडळाची आणि मराठा समन्वयकाशी बैठक पार पडली असून कॉंग्रेसचे अशोक चव्हाण यांनी आपली प्रतिक्रिया माध्यमांना दिली आहे. मंत्रीमंडळाच्या बैठकीत काही नव्या विभागाच्या निर्मिती झाल्या आहेत. त्यांच्या अंमलबजावणीसंदर्भात चर्चा झाली असल्याचं त्यांनी सांगितलं आहे.

काल मराठा समाजाच्या समन्वयकांच्या वतीने मंत्रालयाच्या पायऱ्यावर बसून ठिय्या आंदोलन करण्यात आलं होतं. मुख्यमंत्र्यांशी चर्चा केल्याशिवाय उठणार नाही अशी त्यांची मागणी होती त्यानंतर आज त्यांच्याशी चर्चा करण्यात आली आहे.

दरम्यान शासकीय गोष्टींच्या अंमलबजावणीसाठी काही अवधी लागतो त्यासाठी वेळ द्यावा लागतो असं ते म्हणाले. परंतु विभागनिहाय बैठका झाल्या तर काही प्रश्न सोपे होतील. संबंधित विभागाचे मंत्री आणि अधिकाऱ्यांनी आणि सचिव एकत्र येऊन बैठका पार पडायला पाहिजेत असं मी माझं मत बैठकीत व्यक्त केलं असल्याचं ते म्हणाले. तसेच काही अन्य काम असल्यामुळे आपण बैठकीतून लवकर बाहेर आलो आहोत असंही ते म्हणाले आहेत.

राज्याचे मंत्रीमंडळ आणि मराठा समन्वयकाची बैठक आज पार पडत असून मराठा समाजाच्या प्रलंबित प्रश्नावर चर्चा केली जात आहे. त्यासंबंधित बैठकीत अशोक चव्हाण हे माध्यमांना बोलत होते. सामाजिक सलोखा राखला जाईल अशी अंमलबजावणी केली पाहिजे. बऱ्याचश्या गोष्टींना प्रशासकीय प्रक्रिया असते पण काही वेळा त्याची अंमलबजावणी वेळेत होताना दिसत नाही, त्यासाठी पाठपुरावा करणं महत्त्वाचं आहे असं मत त्यांनी यावेळी व्यक्त केलं.

सध्या ओबीसी आणि मराठा समाजाच्या प्रश्नावरुन चर्चा सुरु आहेत. तसेच ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावरुन निवडणुका पुढे ढकलल्या आहेत. त्यातच आज मराठा समाजाच्या आरक्षणासंदर्भात बैठक पार पडली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

T20 WC 2024 Team India Squad : हार्दिकला कॅप्टन्सीवरून का हटवलं...? आगरकर गडबडला अन् रोहितनं सावरलं

PM Modi Speech : लव्ह जिहाद, लँड जिहाद, आता वोट जिहाद...; PM मोदींची काँग्रेसवर घणाघाती टीका

Brij Bhushan Singh: भाजपनं ब्रिजभूषण सिंहचं तिकीट कापलं! पण मुलाला दिली उमेदवारी; रायबरेलीचाही उमेदवार जाहीर

Prajwal Revanna: "रेवन्ना प्रकरणी प्रधानमंत्र्यांनी 'त्या' पीडित महिलांची माफी मागावी"; राहुल गांधींची मागणी

Naach Ga Ghuma: बॉक्स ऑफिसवर 'नाच गं घुमा'चा धुमाकूळ; ओपनिंग-डेला केली इतकी कमाई

SCROLL FOR NEXT