महाराष्ट्र बातम्या

राष्ट्रवादीसोबतच्या बैठकीबाबत अशोक चव्हाण म्हणाले...

सकाळ डिजिटल टीम

मुंबई : राज्यात सत्तास्थापनेच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसकडून बैठक आयोजित करण्यात करण्यात आली होती. मात्र, आता ही बैठक रद्द झाली आहे. त्यावर काँग्रेसचे नेते अशोक चव्हाण यांनी सांगितले, की ''बैठकीबाबत अद्याप कोणताही निरोप आम्हाला आला नाही. काँग्रेसची बैठक संपली असून, आता राष्ट्रवादीच्या निरोपाची प्रतीक्षा आहे''.

काँग्रेसच्या राज्यातील महत्त्वाच्या नेत्यांची बैठक पार पडली. त्यानंतर काँग्रेस-राष्ट्रवादीची बैठक नियोजित होती. मात्र, त्या बैठकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसकडून अद्याप निरोप आला नाही. आमच्याकडे तशी माहिती नाही. काँग्रेसमधील चर्चा ही प्राथमिक चर्चा होती. राष्ट्रवादीसोबतच्या बैठकीसाठी नियोजन होते. पण त्यानंतर चर्चा झालेली नाही. आता राष्ट्रवादीच्या निरोपाची प्रतिक्षा आहे, असेही अशोक चव्हाण यांनी सांगितले.

काँग्रेस-राष्ट्रवादीमध्ये वाद नाही

काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये कोणताही वाद नाही. बैठकीसाठी चर्चा करणार होतो. पण निरोप अद्याप आला नाही. त्यामुळे चर्चा होऊ शकली नाही. दोन्ही पक्षात चांगला समन्वय आहे. चर्चा आज किंवा उद्या कधीही होऊ शकते, असे चव्हाण म्हणाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

दहावी बारावी परीक्षेचा निकाल कधी लागणार? संभाव्य तारखा आल्या समोर

Bhandara News : साकोलीत वाघाचा थरार! उमरझरी शिवारात मिरची तोडणाऱ्या महिलेवर पट्टेदाराचा हल्ला; १० फूट फरफटत नेले, सुदैवाने जीव वाचला

जेवर विमानतळाचे मोदींच्या हस्ते भव्य उद्घाटन! 'नोएडाला येण्यास आधीचे मुख्यमंत्री घाबरायचे'; अंधश्रद्धेचा पाढा वाचत पंतप्रधानांचा विरोधकांवर प्रहार

Viral News: रातोरात कोट्यधीश! महिलेच्या खात्यात अचानक ९९,९४९,५८६ रुपये जमा झाले, नंतर जे घडलं त्यानं...; गावभर खळबळ

Mumbai News :ठाणे पालिकेत गटार अन् पायवाटांमध्ये २५६० कोटींचा 'झोल'? नगरसेविका मृणाल पेंडसे यांचा घणाघात; मालमत्ता वाटपातही २ हजार कोटींच्या घोटाळ्याचा आरोप

SCROLL FOR NEXT