Devendra Fadanvis & Ashok Chavhan Sakal
महाराष्ट्र बातम्या

Ashok Chavan : फडणवीसांच्या भेटीनंतर अशोक चव्हाणांचा तातडीचा दिल्ली दौरा

सकाळ डिजिटल टीम

Ashok Chavan : राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अशोक चव्हाण यांच्या भेटीनंतर अनेक चर्चांना उधाण आले होते. मात्र, आता या भेटीबाबत खुद्द चव्हाणांनीच स्पष्टीकरण दिले असून, यानंतर या चर्चांना काहीसा ब्रेक लागला आहे.

फडणवीसांच्या भेटीबाबत स्पष्टीकरण देताना चव्हाण म्हणाले की, भाजप आणि शिंदे गटामध्ये समन्वयासाठी नियुक्त केलेल्या आशिष कुलकर्णी यांच्या घरच्या गणपतीसाठी मी गेलो होता. त्यावेळी तेथे माझी आणि फडणवीसांची उभ्या-उभ्या भेट झाल्याचे अशोक चव्हाणांनी सांगितलं आहे. या भेटीदरम्यान कोणतीही राजकीय चर्चा झाली नसल्याचेही चव्हाण म्हणाले. दरम्यान, रविवारी दिल्लीत होणाऱ्या काँग्रेसच्या मोर्चासाठी उद्या राजधानीत जाणार असल्याचेही चव्हाण यांनी यावेळी सांगितले.

गणपतीचं दर्शन चर्चा मात्र काँग्रेस फुटची

अशोक चव्हाण आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस काल रात्री आशिष कुलकर्णी यांच्या घरी गणपतीचे दर्शन घेण्यासाठी गेले होते. त्यावेळी अशोक चव्हाण आणि फडणवीसांमध्ये चर्चा झाल्याचं वृत्त समोर आलं होतं. त्यानंतर भाजप आता काँग्रेसमधील नेत्यांनाही फोडणार असल्याच्या चर्चांना उत आला होता. मात्र, आता स्वतः अशोक चव्हाणांनीच स्पष्टीकरण देत या सर्व चर्चांना पूर्णविराम दिला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT