Eknath shinde latest political News
Eknath shinde latest political News Sakal
महाराष्ट्र

आसाममधून निघण्याआधी एकनाथ शिंदेंसह बंडखोरांकडून पूरग्रस्तांना मदत जाहीर

सकाळ डिजिटल टीम

गेल्या आठ दिवसांपासून आसाममधल्या गुवाहाटीमध्ये शिवसेनेच्या बंडखोर आमदारांसह राज्याचे नगरविकास मंत्री आणि शिवसेना नेते एकनाथ शिंदे वास्तव्यास आहेत. आसाममध्ये पूर परिस्थिती निर्माण झाली आहे. अशातच आता पूरग्रस्तांसाठी या आमदारांनी मदत जाहीर केली आहे. शिंदेंनी ट्वीट करत याबद्दलची माहिती दिली आहे. (Eknath Shinde Assam News)

आसाममधील पूरग्रस्त बांधवांच्या मदतीसाठी शिवसेनेचे सर्व आमदार तसेच सहयोगी आमदारांच्या वतीने आसाम (Assam flood) मुख्यमंत्री मदत निधीत 51 लाख रुपयांची मदत करण्याचा निर्णय घेण्यात आल्याची घोषणा शिंदे यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरुन केली आहे. गेल्या आठ दिवसांपासून एकनाथ शिंदेंसह (Eknath Shinde) बंडखोर आमदार आसाममध्ये आहेत. दरम्यान, आजच ते आसाममधून निघणार आहेत.

आज हे सर्व बंडखोर आमदार आसाममधून गोव्याकडे निघणार आहेत. गोव्यामध्ये हॉटेल ताज ट्रायडेंटच्या काही खोल्या बुक करण्यात आल्या आहेत. त्यानंतर उद्या होणाऱ्या बहुमत चाचणीसाठी हे सर्व आमदार सकाळी मुंबईकडे निघणार आहेत. त्याआधीच बंडखोरांकडून ही मदत जाहीर करण्यात आली आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Devendra Fadnavis : तिथं जा नाश्ता वगैरे करा अन्... उद्धव ठाकरेंच्या भेटीपूर्वी अमित शाहांना फडणवीस काय म्हणाले होते?

Indian Economy: भारताच्या अर्थव्यवस्थेसाठी आनंदाची बातमी! UNने 2024 साठी जीडीपी वाढीचा अंदाज वाढवला

Jalgaon News : दूषित पाण्याच्या नमुन्यांमध्ये लक्षणीय घट; डेंग्यूबाबत आरोग्य यंत्रणेच्या उपाययोजनांना यश

Latest Marathi News Live Update : गिरीश महाजन आणि भुजबळ यांच्यात बंद दाराआड चर्चा सुरू

परदेशात पळून गेलेला खासदार भारतात आलाच नाही; आता 'रेड कॉर्नर नोटीस' बजावणे हाच एकमेव मार्ग शिल्लक!

SCROLL FOR NEXT