Maharashtra Assembly  sakal media
महाराष्ट्र बातम्या

विधानसभा अध्यक्षपद निवडणूक : शिवसेनेकडून आमदारांसाठी व्हीप जारी

सकाळ डिजिटल टीम

मुंबई : राज्यातील सत्तानाट्यानंतर अखेर ११ दिवसांनंतर शिवसेनेचे आमदार विशेष विमानाने गोव्याहून महाराष्ट्रात येणार आहेत, त्यांच्या स्वागतासाटी मुंबईत तयारी करण्यात आली आहे. यादरम्यान शिवसेनेकडून त्यांत्या आमदारांसाठी व्हीप जारी करण्यात आला आहे. विधानसभा अध्यक्ष निवडीसाठी हा व्हिप जारी करण्यात आला आहे. शिवसेनेच्या सर्व आमदारांना व्हीप लागू असणार आहे. विधानसभा अध्यक्षपदासाठी राजन साळवी हे महाविकास आघाडीचे उमेदवार असणार आहेत.

राज्यात महाविकास आघाडीचे सरकार कोसळल्यानंतर भाजपने आता मविआला दुसरा झटका देत आता विधानसभा अध्यक्षपदासाठी राहुल नार्वेकर यांना उमेदवारी दिली आहे. त्यानुळे आता राजन साळवी आणि नार्वेकर यांच्यात लढत होणार आहे. उद्या होणाऱ्या या विधासभा अध्यक्षपदाच्या निवडणूकीत मतदान करण्यासाठी शिवसेनेने आमदारांना व्हीप जारी केला आहे.

दरम्यान उद्या होणाऱ्या या निवडणूकीत महाविकास आघाडीचे उमेदवार राजन साळवी यांनी मतदान करण्याचे आदेश प्रतोद सुनिल प्रभू यांनी आमदारांना दिले आहेत. प्रतोद सुनिल प्रभू यांनी शिवसेनेच्या सर्व आमदारांना पत्र जारी करत राजन साळवी यांना मतदान करण्यास सांगितले. त्यामुळे यानंतर आता एकनाथ शिंदे गट याबाबत काय भूमिका घेणार याकडे सर्वांचे लक्ष असणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Rupali Chakankar Resigns: ''समाजात आपण कुणालातरी गुरु मानत असतो...'' राजीनाम्यानंतर रुपाली चाकणकरांनी दिलं स्पष्टीकरण

Shivajinagar News : नंबरप्लेटवर चिखल फासून होतेय दिशाभूल; महापालिकेचा फलक लावून शहरात बेकायदा राडारोड्याची वाहतूक

Maharashtra Kesari: महाराष्ट्र केसरी कुस्ती थरारक! मल्लांच्या जिद्द, ताकद आणि कौशल्याने मैदान दणाणलं; जखमी सिकंदर शेखचा आक्रमक खेळ

Pimpri News : ‘मेट्रो मार्गिका-३’ चे काम अंतिम टप्प्यात! हिंजवडी मेट्रोची १२ स्थानके मेपर्यंत सुरू करण्याचे उद्दिष्ट; पीएमआरडीए आयुक्तांकडून पाहणी

पहिल्याच सभेत झेडपी अध्यक्ष-उपाध्यक्षांनी घेतला शिक्षणाधिकाऱ्यांचा तास! शिक्षकांना शिस्त लावा, शाळेत थांबण्याची सक्ती करा, शिक्षणाधिकारी म्हणाले...

SCROLL FOR NEXT