MLA Disqualification Case Esakal
महाराष्ट्र बातम्या

MLA Disqualification Case: आमदार अपात्रतेप्रकरणी घडामोडींना वेग! विधानसभा अध्यक्ष तातडीने दिल्लीला रवाना

कायदेतज्ज्ञांशी चर्चा करण्यासाठी दिल्लीला रवाना झाल्याची माहिती

अंकिता खाणे (Ankita Khane)

विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर तातडीने दिल्लीला रवाना झाले असल्याची माहिती आहे. येत्या एक ते दोन दिवसात ठाकरे आणि शिंदे गटाला राहुल नार्वेकर यांच्याकडून नोटीस पाठवली जाणार असल्याची माहिती आहे. त्याच पार्श्वभूमीवर कायदेतज्ज्ञांशी चर्चा करण्यासाठी दिल्लीला रवाना झाल्याची माहिती आहे.

शिवसेनेच्या ठाकरे गटाला आणि शिंदे गटाला येत्या दोन दिवसात नोटीस पाठवली जाणार आहे. अशातच आज राहुल नार्वेकर तातडीने दिल्लीला रवाना झाले आहेत. या दौऱ्यादरम्यान ते वरिष्ठ कायदेतज्ज्ञांशी चर्चा करणार असल्याची माहिती आहे.

सर्वोच्च न्यायालयाकडून काही दिवसांपुर्वी नाराजी व्यक्त करण्यात आली होती. त्यानंतर ठाकरे गटाने देखील आपली नाराजी व्यक्त केली होती. विधानसभा अध्यक्ष निर्णय घेण्यासाठी उशीर करत असल्याचा आरोप ठाकरे गटाने केला आहे. त्यामुळे आता शिवसेनेच्या दोन्ही गटाच्या प्रमुखांना नोटीस पाठवण्यात येणार आहे. त्याच पार्श्वभूमीवर नार्वेकर यांचा हा दौरा महत्त्वाचा असणार आहे. यासंबधीचे वृत्त 'एबीपी माझा'ने दिले आहे.

एकनाथ शिंदे आणि उध्दव ठाकरे यांना आमदार अपात्रतेबाबत आपली बाजू मांडावी लागणार असल्याची माहिती समोर आली आहे. एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे यांना विधानसभा अध्यक्ष लवकरच नोटीस पाठवणार असल्याची माहिती आहे.

आमदार अपात्रता याचिकांवरील सुनावणीसाठी दोन्ही गटांच्या पक्षप्रमुखांना आपली बाजू एक- दोन आठवड्यामध्ये मांडण्यासाठी ही नोटीस बजावण्यात येणार असल्याची माहिती आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

INDW vs AUSW Live: भारतीय संघाचे T20 World Cup मधून पॅकअप! ऑस्ट्रेलियाचा दणदणीत विजय अन् दक्षिण आफ्रिका उपांत्य फेरीत... हरमनप्रीत कौरच्या संघाला अपयश

IND vs IRE 2nd T20I : आयर्लंडने इतिहास रचला! भारतीय संघाला ट्वेंटी-२० मालिकेत नमवले, श्रेयस अय्यरच्या नेतृत्वाची लाजीरवाणी सुरुवात

पुणे-मुंबई एक्स्प्रेसवेवर वाढला मृत्यूचा धोका! टोल टाळण्यासाठी 'नो-एंट्री'तून वाहनांची सर्रास एंट्री; नियमांना हरताळ

Latest Marathi News Update : राज्यासह देशविदेशात दिवसभरात काय काय घडलं? वाचा एका क्लिकवर...

Vidarbha Rain Alert : विदर्भासाठी दिलासादायक बातमी! पावसाचा जोर वाढणार, ११ जिल्हे यलो अलर्टवर

SCROLL FOR NEXT