Eknath Shinde, Devendra Fadnavis and Ajit Pawar  Esakal
महाराष्ट्र बातम्या

Maharashtra Politics: राजकीय घडामोडींना वेग! रात्री मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री यांची ‘वर्षा’वर दोन तास बैठक, कशावर झाली चर्चा?

मुख्यमंत्र्यांच्या शासकीय निवासस्थानी अचानक रात्री दहा वाजण्याच्या आसपास मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री यांची बैठक झाली

अंकिता खाणे (Ankita Khane)

राज्याच्या राजकारणात गेल्या काही दिवसांमध्ये अनेक घडामोडी घडल्या आहेत. अशातच काल(शनिवारी) रात्री 10 वाजण्याच्या आसपास राजकीय घडामोडींना वेग आला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ‘वर्षा’ या शासकीय निवासस्थानी बैठक पार पडली आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वर्षा निवासस्थानी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार दाखल झाले. या तीनही नेत्यांमध्ये ‘वर्षा’ निवासस्थानी बैठक पार पडली. मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी ही बैठक दोन तास चालली आहे. तर या बैठकीमध्ये ओबीसी आरक्षण, मराठा आरक्षण तसेच कांदा प्रश्नावर चर्चा झाल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. अचानक झालेल्या या भेटीमुळे राजकीय चर्चांना उधाण आलं आहे.

दरम्यान गणेशोत्सवामध्ये अजित पवार हे एकनाथ शिंदे यांच्या ‘वर्षा’ निवासस्थानी गणपतीच्या दर्शनासाठी गेले नव्हते. त्यामुळे अजित पवार नाराज असल्याच्या चर्चा सोशल मीडियावर सुरु होत्या. त्यानंतर आता अजित पवार, देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत एकनाथ शिंदे यांच्या ‘वर्षा’ निवासस्थानी बैठकीसाठी दाखल झाले.

या बैठकीमध्ये मराठा आरक्षणाबाबत, ओबीसी आरक्षण, कांदा प्रश्न या महत्त्वांच्या गोष्टीवर चर्चा करण्यात आली आहे. राज्य मंत्रिमंडळाचा विस्तारही गेल्या वर्षभरापासून रखडलेला आहे. या मंत्रिमंडळ विस्ताराकडे सत्ताधारी पक्षाच्या आमदारांचं लक्ष आहे. दरम्यान या बैठकीत यासंदर्भातही चर्चा झाल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bidkin News : रस्त्याच्या कामावरून वाद; लोखंडी रॉडने मारहाण करणारे तिघे अहिल्यानगर हद्दीजवळून ताब्यात...

Dog Bite : पिसाळलेल्या कुत्र्याचा धुमाकूळ; आळे परिसरातील बारा जणांचा घेतला चावा; नऊ जण गंभीर

Pune News : राज्यातील ऑनलाइन कामकाज ठप्प; कृषी कर्मचाऱ्यांनी लॅपटॉप जमा केले, आंदोलन तीव्र

Vastu Tips: घरात क्रिस्टल पिरामिड ठेवल्यावर काय होते? वास्तुशास्त्रानुसार जाणून घ्या योग्य दिशा, फायदे अन् महत्त्वाचे नियम...

FDA Watch : प्रसादवाटप करणाऱ्या मंडळांना ‘एफडीए’ची नोंदणी बंधनकारक; प्रसादावर ‘एफडीए’ची नजर

SCROLL FOR NEXT