Narayan Rane On PM Modi Security sakal
महाराष्ट्र बातम्या

पंतप्रधान मोदींच्या ताफ्यावर दगडफेक, नारायण राणेंचा अजब तर्क

सकाळ डिजिटल टीम

मुंबई : पंतप्रधान मोदी (PM Modi) पंजाब दौऱ्यावर असताना ते १५-२० मिनिटं एका उड्डाणपुलावर अडकून पडले होते. तसेच त्यांच्या सुरक्षेमध्ये गंभीर चूक (PM Modi Security Breach) असल्याचं केंद्रीय गृहमंत्रालयानं म्हटलं आहे. पण, केंद्रीय मंत्री नारायण राणे (Union Minister Narayan Rane) यांना पंतप्रधानांवर हल्ला झाल्याचा साक्षात्कार झालाय की काय असं दिसतंय. कारण, त्यांनी तसं वक्तव्य देखील केलंय. त्याबाबतचा एक व्हिडिओ व्हायरल होतोय.

मोदींच्या सुरक्षेच्या प्रश्नावरून नारायणे राणे म्हणतात, ''पंतप्रधान मोदी पंजाबच्या दौऱ्यावर होते. ते त्याठिकाणी विकासकामांचे उद्घाटन करण्यासाठी जात होते. त्यासाठी ते हेलिकॉप्टरने जाणार होते. पण, वातावरण खराब असल्याने रस्त्यानं गेले. रस्त्यावर त्यांना थांबवून समोरून दगडफेक करण्यात आली. तसेच पंतप्रधानांवर हल्ला करण्यात आला'', असा अजब तर्क नारायण राणे यांनी लढवला आहे. तसेच त्या घटनेचा निषेध देखील त्यांनी नोंदवला असून काँग्रेसवर टीका केली आहे. अशा घाणेरड्या गोष्टी आणि षडयंत्र काँग्रेसच करू शकतं, असं राणे म्हणाले.

नाना पटोलेंनी लगावला टोला -

काही लोक म्हणतात पंतप्रधान मोदींच्या ताफ्यावर दगडफेक झाली. पण, वय कमी झालं की माणसाला कमी दिसतं. पण, काही लोकांना वय जास्त झाल्यानंतर जास्त दिसत असेल तर माहिती नाही. ही घटना घडवून आणली आहे, असं म्हणत काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंनी नारायण राणेंना टोला लगावला आहे.

मोदींच्या दौऱ्याबाबत केंद्रीय गृहमंत्रालयानं काय म्हटलंय? -

''पंतप्रधान मोदींची पंजाबमध्ये फिरोजपूर येथे सभा होती. त्यासाठी मोदी भटींडामध्ये उतरले होते. त्यानंतर ते हुसैनीवालामध्ये राष्ट्रीय शहीद स्मारकाला हेलिकॉप्टरने जाणार होते. पण, पंजाबमध्ये पावसाचं वातावरण होतं. २० मिनिटे वाट पाहून देखील वातावरण ठीक झालं नाही. त्यामुळे त्यांनी रस्त्यानं जाण्याचं ठरलं. पंजाब पोलिसांनी सुरक्षेची हमी दिल्यानंतर मोदींचा ताफा रवाना झाला. पण, मध्येच आंदोलकांनी रस्ता अडवल्यामुळे त्यांचा ताफा अडकून पडला होता. पंतप्रधानांच्या सुरक्षेती गंभीर चूक होती'', असं केंद्रीय गृहमंत्रालयाच्या वतीने जारी करण्यात आलेल्या निवेदनात म्हटलं आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

मी खिलाडूवृत्ती दाखवली असती! Run Out वर सलमान अली आघाची प्रतिक्रिया; सचिनला बाद केले तेव्हा विसरलेले sportsmanship

FASTag Annual Pass वार्षिक टोल पास झाला महाग, १ एप्रिलपासून नवे दर लागू

Nashik LPG Supply : नाशिककरानो घाबरू नका! जिल्ह्यात पुरेसा गॅस साठा; अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन

Nutritionist Health Tips: तुम्हाला 35 वर्षानंतरही राहायचंय फिट आणि निरोगी? न्यूट्रिशनिस्टच्या ‘या’ टिप्स नक्की फॉलो करा

Iran Israel War मुळे भारतात दारूचा दुष्काळ? उन्हाळ्यात थंड बिअरही मिळणार नाही? उत्पादनावर काय परिणाम होणार

SCROLL FOR NEXT