Attack on Raj Thackeray without naming the Chief Minister Attack on Raj Thackeray without naming the Chief Minister
महाराष्ट्र बातम्या

ही केमिकल लोच्याची केस, राज ठाकरेंचं नाव न घेता मुख्यमंत्र्यांची टीका

सकाळ डिजिटल टीम

मुंबई : मुन्नाभाई चित्रपटात मुन्नाभाई जसा गांधीजी बनला होता. तसा एक बाळासाहेब ठाकरे सध्या फिरत आहे. कधी खांद्यावर शाल घेऊन फिरतो तर कधी कधी हिंदुत्वाच्या नादाला लागतो. त्याला आपण हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे झाल्यासारखं वाटत आहे. हा केमिकल लोटा आहे, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे नाव न घेता राज ठाकरे यांना टोला हाणला.

काही दिवसांपूर्वी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना आव्हान देत मशिदीवरील भोंगे बंद करण्याचे आव्हान केले होते. तसेच त्यांच्या हिंदुत्वावर प्रश्न उपस्थित केला होता. आपल्यालाच हिंदुत्वाची काळजी आहे, असे त्यांनी भासवले होते. अनेक नेते राज ठाकरे हे बाळासाहेब ठाकरे यांच्यासारखे बोलत असे म्हणत होते. त्यांची बोलण्याची पद्धत बाळासाहेब ठाकरे यांच्या सारखी असल्याचे अनेकजण म्हणाले होते. यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज ठाकरे यांच्यावर हल्ला केला.

मागे मी एका कार्यकर्त्याला फोन केला होता. त्यानी मला मुन्नाभाई चित्रपट बघितला होता का, असा प्रश्न केला होता. मी काय संबंध आहे असं म्हटलं तर मुन्नाभाईला जसे महात्मा गांधी दिसत होते तसेच एकाला आपण बाळासाहेब ठाकरे झाल्यासारखे वाटत असल्याचे तो म्हणाला. मी म्हणालो कोण रे, तर तो म्हणाला तो नाही का.. कधी खांद्यावर शाल घेऊन फिरतो तर कधी कधी हिंदुत्वाच्या नादाला लागतो, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले.

त्यानी मला तुम्ही चित्रपटाचा शेवट बघितला का, असाही प्रश्न केला. शेवटी मुन्नाभाईला वाटते की आपल्या दिमाखात काही तरी केमिकल लोचा झाला आहे, तसा लोटा या सद्याच्या बाळासाहेबामध्ये झाला आहे, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे नाव न घेता राज ठाकरे यांना म्हणाले. फिरू द्या अशा बाळासाहेबाला, असेही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs AFG, Video: बुमराह आला अन् दुसऱ्याच बॉलवर विकेट घेतली! भुवनेश्वर कुमारच्या पंक्तीत मिळवलं स्थान

पेट्रोल-डिझेल आणखी महागणार? सौदीची पाइपलाइन बंद, फक्त ५ ते ७ दिवसांचा तेलसाठा शिल्लक

युनायटेड किंगडममध्ये फूट पडणार? स्कॉटलंड, वेल्स अन् नॉर्दर्न आयर्लंडचे नेते करणार मोठी घोषणा?

Asia Cup Final, Playing XI: भारताने श्रीलंकेविरुद्ध जिंकला टॉस! ट्रॉफी वादाच्या पार्श्वभूमीवर मोहसिन नक्वींच्या उपस्थितीबाबत सस्पेन्स

Arni Crime: आर्णीत पूजा करण्याच्या बहाण्याने महिलेला गुंगीचे औषध; अश्लील व्हिडिओ काढून पैशांची मागणी

SCROLL FOR NEXT