Altaf Pevekar Attacks Esakal
महाराष्ट्र बातम्या

Altaf Pevekar Attack: शिंदे गटाच्या विभाग प्रमुखावर अज्ञातांकडून हल्ला; तोंडाला रूमाल बांधून आले अन्.., तपास सुरू

शिंदे गटाचे अंधेरी विभाग प्रमुख अल्ताफ पेवकर यांच्यावर अज्ञात मारेकऱ्यांकडून हल्ला केल्याची माहिती

अंकिता खाणे (Ankita Khane)

शिवसेना (शिंदे गटा)चे अंधेरी विभागाचे प्रमुख अल्ताफ पेवकर यांच्यावर अज्ञात व्यक्तींनी हल्ला केल्याची माहिती समोर आली आहे. काल (सोमवारी) रात्री साडेअकरा वाजण्याच्या सुमारास हा हल्ला झाल्याची माहिती समोर आली आहे.

अल्ताफ पेवकर वर्सोवा येथून आपल्या कारने घरी निघाले असताना, हल्लेखोर तोंडाला रूमाल बांधून आले आणि त्यांनी अचानक हल्ला चढवला. हल्लेखोरांनी बॅटच्या सहाय्याने अल्ताफ पेवकर यांच्या कारची काच फोडली. तसेच त्यांना मारहाण देखील केली आहे.

या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. हा हल्ला ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी केल्याचा आरोप अल्ताफ पेवकर यांनी केला आहे. दरम्यान, अल्ताफ पेवकर यांच्यावर हल्ला झाल्याची माहिती मिळताच शिंदे गटाचे कार्यकर्ते वर्सोवा पोलीस ठाण्याबाहेर जमले होते.

आरोपींवर तातडीने गुन्हा दाखल करावा, त्याचबरोबर त्यांना तत्काळ अटक करावी, अशी मागणी कार्यकर्त्यांकडून करण्यात आली. या घटनेमुळे वर्सोवा पोलीस ठाण्याबाहेर काही काळ तणावाचं वातावरण पसरलं होतं.

घटनेबाबत मिळालेल्या माहितीनुसार, शिवसेना शिंदे गटाचे अंधेरी आणि वर्सोवा विधानसभा क्षेत्राचे विभाग प्रमुख अल्ताफ पेवकर सोमवारी रात्री साडेअकरा वाजण्याच्या सुमारास आपल्या कारने घरी जाण्यासाठी निघाले होते. ते अंधेरी पश्चिमेकडील मॉडेल टाउन परिसरात त्यांची कार आली असता, अज्ञात व्यक्तींनी त्यांच्यावर अचानक हल्ला चढवला.

हल्लेखोरांनी हातात असलेल्या बॅट आणि हॉकीस्टिकने अल्ताफ यांच्या कारची काच फोडली. हल्लेखोरांनी तोंडाला रूमाल बांधलेला असल्यामुळे त्यांना ओळखता आलं नाही.

दरम्यान, हा हल्ला कोणी केला? राजकीय वर्चस्व वादातून हा हल्ला झाला का? याबाबत सध्या पोलीस तपास करत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs SA, 1st ODI: विराटचा सेलिब्रेशनला नकार, तर रोहितची प्रशिक्षकाशी गंभीर चर्चा; सामन्यानंतरच्या Video ने वाढवले टेन्शन

Mumbai Local: गरम अन् ताजं जेवण मिळणार...! मुंबई ट्रेन प्रवास स्वादिष्ट होणार; रेल्वे केटरिंगचा मोठा मेगा प्लॅन तयार, वाचा...

आतातरी अर्ध्यातून शो सोडू... रितेश देशमुख 'बीबीमराठी६' चं होस्ट करणार समजताच नेटकऱ्यांनी दिले सल्ले; आठवण करून देत म्हणाले-

Government Mandatory Preload APP : मोबाइल चोरी झाला, हरवला तरी 'No Tension'; सरकारी आदेशानुसार आता प्रत्येक स्मार्टफोनमध्ये असणार 'हे' खास 'APP'

Maharashtra Politics: मनसेला मोठा धक्का! ३ बड्या नेत्यांनी सोडली साथ, कमळ घेतलं हाती

SCROLL FOR NEXT