Santosh Bangar 
महाराष्ट्र बातम्या

Eknath Shinde Group MLA: 50 खोके एकदम ओके म्हणत, संतोष बांगर यांच्या गाडीवर हल्ला

सकाळ डिजिटल टीम

अमरावती -एकनाथ शिंदे गट आणि उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेतील संघर्ष दिवसेंदिवस टोकाला जाताना दिसत आहे. मुळ शिवसेना कोणाची हा मुद्दा सध्या न्यायप्रविष्ट आहे. मात्र ग्राउंड लेव्हलला शिंदे गट आणि शिवसेनेच्या कार्यकर्त्यांकडून एकमेकांना लक्ष्य करण्यात येत आहे. त्यातच शिंदे गटाचे चर्चेतील आमदार संतोष बांगर यांच्या गाडीवर अमरावती येथे हल्ला करण्यात आला. (Santosh Bangar news in Marathi)

आमदार संतोष बांगर अमरावती येथील अंजनगावसुर्जी येथे गेले असताना त्यांच्यावर स्थानिक शिवसैनिकांकडून हल्ला करण्यात आल्याचं सांगण्यात आलं आहे. यावेळी ५० खोके एकदम ओकेच्या घोषणा देत हल्ला करण्यात आला. या घटनेचे व्हिडीओ देखील व्हायरल झाले आहे.

मागील अनेक दिवसांपासून संतोष बांगर हे चर्चेत आहेत. बांगर हे सुरुवातीला शिवसेना गटात होते. मात्र ऐनवेळी ते शिंदे गटात सामील झाले. तसेच त्यांनी मुंबईत शिक्तीप्रदर्शन देखील केले होते. या व्यतिरिक्त ते उद्धव ठाकरे गटावर टीका करताना देखील दिसून आले होते.

दरम्यान अमरावतीमध्ये झालेल्या हल्ल्यानंतर अद्याप बांगर यांच्याकडून कोणतीही प्रतिक्रिया देण्यात आलेली नाही. मात्र शिंदे गटाच्या नेत्यावर हल्ला होण्याच्या घटना दिवसेंदिवस वाढत असून याआधी उदय सामंत याच्या गाडीवर पुण्यात हल्ला झाला होता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ayodhya Deepotsav 2026 New World Record : अयोध्येत ३० लाख दिव्यांसोबत घडणार अद्भूत चमत्कार! रामनगरीत 'त्या' परदेशी सादरीकरणाने जगभरातील भाविक थक्क होणार

Bageshwar Baba Controversial Statement Row : "ईशनिंदेला माफी नाही, राज्यात पाय ठेवू देणार नाही!"; प्रभू श्रीकृष्णावरील 'त्या' विधानावरून देशात मोठा भडका; दोन दिग्गज नेत्यांमध्ये थेट युद्ध

Captain Vaibhav Sooryavanshi : १५ व्या वर्षी वैभव सूर्यवंशी बनला टीमचा कॅप्टन! त्याच्या नेतृत्वाखाली बघा कोण कोण खेळणार, मॅच कधी व कुठे होणार?

Nashik TCS Case: एमआयएम नेते इम्तियाज जलील अधिकृतपणे सहआरोपी; संजय शिरसाटांचा "त्याला तुरुंगात जावेच लागेल" असा थेट घणाघात

Latest Marathi News Update : पुणे महापालिकेत माजी उपमहापौरांचे महिला कर्मचाऱ्यासोबत गैरवर्तन

SCROLL FOR NEXT