atul bhatkhalkar,Chhagan Bhujbal Esakal
महाराष्ट्र बातम्या

'भाजप विरोधात लढण्यासाठी फक्त काँग्रेस कशाला? तालिबान,आयएसआय घ्या'

अतुल भातखळकर यांनी भुजबळ यांच्यावर टीकास्त्र सोडले.

सकाळ डिजिटल टीम

भाजप विरोधात लढण्यासाठी काँग्रेसला (Congress) सोबत ठेवण्याचा सल्ला अन्नपुरवठा मंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी दिला. यावरून भाजप नेते अतुल भातखळकर (Atul Bhatkhalkar) यांनी भुजबळ यांच्यावर टीकास्त्र सोडले. फक्त काँग्रेस कशाला? जमलं तर एमआयएम, मुस्लिम लीग, तालिबान आणि आयएसआय यांना देखील सोबत घ्या असा खोचक टोला भातखळकरांनी ट्विट करत लगावाला.

पाज राज्यात काॅंग्रेसचा पराभव झाल्यानंतर सर्वच स्थरातून याविषयी चर्चा होत आहे. पुढच्या निवडणूकीचा अजेंडा ठरविण्यासाठी काॅंग्रेस नेत्या सोनिया गांधी यांनी बैठक बोलवली. यानंतर अन्नपुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनीही स्थानिक पक्षाला काँग्रेसने सहकार्य करावे आणि काँग्रेस प्रबळ असलेल्या ठिकाणी इतरांनी नमते घ्या असे सूत्रच सांगितले. यावर भाजप नेत्यांनी टीका करण्यास सुरुवात केली आहे.

काय म्हणाले छगन भुजबळ

एका राजकीय पक्षाची सत्ता असली, तरीही कुरबुरी होतात. यापूर्वी दोन पक्षांचे सरकार होते, तरीही कुरबुरी होत्या. आता तीन पक्षांचे सरकार असून कुरबुरी असल्या तरीही महाविकास आघाडी १५ वर्षे राज्यात सत्तेत राहील, असा दावा भुजबळ यांनी केला. भाजपचे नेते सांगतात तशा केंद्रीय यंत्रणा हलतात. त्यामुळे कुणाला अटक होणार हे अगोदर सांगितले जाते आणि मग कारवाई होते. त्यावरुन त्यांचे नेते यंत्रणांचा भाग झाले आहेत, असा आरोप त्यांनी केला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ganeshotsav Special: गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या भक्तांना मध्य रेल्वेची मोठी भेट; सीएसएमटी, एलटीटी, पुणे व दिवाहून तब्बल २४६ गणपती विशेष गाड्या

Warana Dam Water Release VIDEO : सांगलीकरांनो सावधान! वारणा धरणाचे 4 दरवाजे उघडले, नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा; 3,400 क्युसेकने विसर्ग सुरू

Mumbai News: मुंबईच्या वस्त्यांमध्ये वाढते मजले, कमी होते सुरक्षिततेचे भान; दुर्घटनांचा धोका कायम

Shirur Protest: अण्णाभाऊ साठे स्मारकासाठी शिरूर नगरपरिषदेसमोर लहूजी शक्ती सेनेचे बेमुदत उपोषण, दोन दिवसांत निर्णय न झाल्यास रास्ता रोकोचा इशारा

ZP Budget Boost: पुणे जिल्हा परिषदेचे ३३३ कोटींचे पुरवणी अंदाजपत्रक मंजूर; कृषी, शिक्षण, आरोग्य व महिला-बालकल्याण विभागांना भरीव तरतूद

SCROLL FOR NEXT