Atul-Bhatkhalkar sakal media
महाराष्ट्र बातम्या

सुनेची EDने केलेली चौकशी पचनी पडली नाही, भातखळकरांची जया बच्चनवर टीका

ईडीने सोमवारी दिल्लीतील कार्यालयात अभिनेत्री ऐश्वर्या राय बच्चनची पनामा पेपर्स प्रकरणी चौकशी केली.

सकाळ डिजिटल टीम

मुंबई : सुनेची सक्तवसुली संचालनालयाने (ED)केलेली चौकशी राज्यसभा खासदार जया बच्चन यांच्या पचनी पडलेली दिसत नाही, अशी टीका भाजपचे आमदार अतुल भातखळकर (Atul Bhatkhalkar) यांनी बच्चन यांच्यावर केली आहे. सोमवारी (ता.२०) राज्यसभेत बोलताना समाजवादी पक्षाच्या खासदार तथा अभिनेत्री जया बच्चन (Jaya Bachchan) यांनी विद्यमान सरकारवर संताप व्यक्त केला. त्या म्हणाल्या, की तुमचे वाईट दिवस लवकरच येतील असा मी तुम्हाला शाप देते. मुळात बच्चन या नार्कोटिक्स विधेयकावर बोलणार होत्या. पण त्यांनी आपल्या बोलण्यात मोदी सरकारवर (Modi Government) हल्लाबोल केल्याचे दिसले. भातखळकर आपल्या ट्विटमध्ये म्हणतात, पनामा पेपर्स लीक झाल्यामुळे आपल्या सुनेची EDने केलेली चौकशी राज्यसभा खासदार जया बच्चन यांच्या पचन पडलेली दिसत नाही.(Atul Bhatkhalkar Criticize On Jaya Bachchan's Remark)

उद्योगपतींच्या घराबाहेर जिलेटिनच्या कांड्यांनी भरलेली गाडी सत्ताधाऱ्यांच्या आशीर्वादानेच ठेवली जात असेल, तर ते आपणहून राज्याबाहेर पळणारच. कोणी पळवून नेण्याची काय गरज, अशा शब्दांत त्यांनी उद्योग मंत्री सुभाष देसाई यांच्या अमित शहांवरील टीकेचा समाचार घेतला.

अभिनेत्री ऐश्वर्या राय बच्चनची चौकशी

ईडीने सोमवारी दिल्लीतील कार्यालयात अभिनेत्री ऐश्वर्या राय बच्चनची (Aishwarya Rai Bachchan) पनामा पेपर्स (Panama Papers) प्रकरणी चौकशी केली. या अगोदर तिला दोनदा समन्स बजावण्यात आले होते. ऐश्वर्या राय बच्चनने परदेशात कंपनी (Mumbai) स्थापन करुन करचोरी आणि परकीय चलन कायद्याचे उल्लंघन केल्याची माहिती उघड झाल्यामुळे ईडीकडून चौकशी करण्यात आली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Hasan Mushrif: कागलमध्ये समेट! हसन मुश्रीफांच्या सून बिनविरोध; शिंदे गटाने घेतली माघार

PM Kisan 21st Installment : मोठी बातमी! पंतप्रधान मोदींनी किसान सन्मान योजनेचा २१वा हप्ता केला जारी

U19 World Cup 2026 स्पर्धेचे वेळापत्रक जाहीर! भारताचे सामने कुठे आणि कधी होणार? जाणून घ्या

मुंबईत भरदिवसा बिल्डरवर झाडल्या गोळ्या, दोन गोळ्या पोटात घुसल्या; गोळीबाराच्या घटनेनं खळबळ

Anmol Bishnoi: अखेर लॉरेन्स बिश्नोईचा भाऊ अनमोलला भारतात आणलं; NIA कडून अटक, कसा बनला भारतातील 'मोस्ट वॉन्टेड'?

SCROLL FOR NEXT