Vasant More Esakal
महाराष्ट्र बातम्या

Vasant More: "ऑडी जुनीच आहे फक्त...", वसंत तात्यांचा लोकसभा पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ईडीला टोमणा

पुणे लोकसभा पोटनिवडणूक लढवण्यासाठी वसंत मोरे इच्छुक

अंकिता खाणे (Ankita Khane)

गेल्या काही दिवसांमध्ये सत्ताधारी पक्ष विरोधी पक्षांच्या मागे ईडी सीबीआय लावत असल्याचा आरोप विरोधक वारंवार करताना दिसून येतात. अशातच मनसेचे नेते वसंत मोरे यांनी त्यांच्या सोशल मीडिया अकाऊंटवरून पोस्ट शेअर करत मिश्किल टीका केली आहे. (Latest Marathi News)

मनसे नेते वसंत मोरे यांनी त्यांचा ऑडीसोबतचा फोटो त्यांच्या सोशल मिडियावर शेअर करत, 'ऑडी जुनीच आहे फक्त कलर नवीन केलाय, नाहीतर खासदारकीला नाव आलंय उगाच गैरसमजाने गाडी पाहून ईडी वाले यायचे घरी', असं कॅप्शन देत वसंत मोरे यांनी लोकसभा पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ईडीला टोमणा मारला आहे.

पुणे लोकसभा पोटनिवडणूक लढवण्यासाठी वसंत मोरे इच्छुक

'पक्षानं जर संधी दिली तर मी निवडणुकीसाठी तयार आहे', असं वक्तव्य महाराष्ट्र नवनिर्मण सेनेचे नेते वसंत मोरे यांनी काही दिवसांपूर्वी केलं आहे. भाजपचे ज्येष्ठ नेते आणि खासदार गिरीश बापट यांच्या निधनानंतर रिक्त झालेल्या जागेवर पोटनिवडणूक होण्याची शक्यता आहे. यातच माध्यमांशी बोलताना वसंत मोरे यांनी हे मोठं वक्तव्य केलं आहे.(Latest Marathi News)

''पक्षानं जर संधी दिली तर मी निवडणुकीसाठी तयार आहे. 2017 ची पुणे मनपाची निवडणूक पाहिली तर मध्यमवर्गीय उमेदवार होते, तरीही पुणे शहरातील मतदान पाहता 3 लाख 79 हजार मतं आहेत. पोटनिवडणुकीत कोणी मोठा तुल्यबळ नेता धाडस करणार आहे.''

''मनसे कार्यकर्ता जर झाडून कामाला लागला तर चमत्कार घडू शकेल.'' ही पोटनिवडणूक लढवण्याची तुमची इच्छा आहे का? असं त्यांना विचारलं असता ते म्हणाले, ''निवडणूक लढवण्यासाठी इच्छा का नसावी? माझं काम चांगलं आहे. राजकारणात असेल तर मोठी स्वप्न पाहिली पाहिजे. वाहतूक, आरोग्य क्षेत्रातील कामं पाहता निवडणूक लागली तर मी राज ठाकरेंशी बोलेन.''(Marathi Tajya Batmya)

राज्यात आतापर्यंत अनेक पोटनिवडणुका बिनविरोध झाल्या आहेत. मात्र या पोटनिवडणुकीसाठी सर्वच राजकीय पक्षांनी तयारी केली आहे. यातच वसंत मोरे यांचं हे वक्तव्य महत्वाचं म्हणालं जात आहे.(Marathi Tajya Batmya)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ahilyanagar gas Pipeline: अहिल्यानगरवासियांची प्रतीक्षा संपली; गॅस पाइपलाइनचा मार्ग मोकळा; तत्काळ काम सुरू करण्याचे शासनाचे आदेश!

Latest Marathi News Live Update : मेट्रो ९ उद्घाटनाआधीच श्रेयवादाचा वाद; 6 एप्रिलला सोहळा

Kashi-Ujjain Tourism: काशी ते उज्जैन थेट कनेक्शन!! महाकाल-विश्वनाथ मंदिर ट्रस्टमध्ये ऐतिहासिक करार; धार्मिक पर्यटनाला बुस्ट

Hanuman Jayanti 2026: हनुमान जयंतीला सुंदरकांड पठण का मानलं जातं सर्वात प्रभावी? मानसिक शक्ती, आरोग्य अन् यशाचे गुपित फायदे काय?

History Of Rajapur : राजापूर पालिकेची १५० वर्षे; १८७६ मध्ये विकासाची नांदी, बंदर-घाटमाथा संपर्काचे केंद्र

SCROLL FOR NEXT