oxygen plant sakal media
महाराष्ट्र बातम्या

औरंगाबाद MIDC मध्ये ऑक्सिजन निर्मिती प्रकल्प; तिसऱ्या लाटेसंदर्भात सावधगिरी

कृष्ण जोशी

मुंबई : औरंगाबाद एमआयडीसीमधील (aurangabad MIDC) महापालिकेच्या कोविड केअर हॉस्पीटलमध्ये (municipal corona hospital) शिवसेना उपनेते सचिन अहिर (sachin ahir) यांच्या प्रयत्नांनी उभारलेल्या ऑक्सिजन निर्मिती प्लांटचे (oxygen plant) नुकतेच लोकार्पण करण्यात आले. कोरोनाविरुद्धच्या लढ्याचा एक भाग म्हणून दीपक फर्टिलायझर्स (deepak fertilizers) कंपनीच्या सहकार्याने हा प्रकल्प उभारण्यात आला आहे.

या प्रकल्पाची क्षमता मिनिटाला 250 लीटर तर दिवसाला अर्धा मेट्रिक टन ऑक्सिजन निर्मितीची आहे. औरंगाबादचे पालकमंत्री सुभाष देसाई यांच्या हस्ते दृकश्राव्य माध्यमातून या प्रकल्पाचे उद्घाटन झाले. कोरोनाचा विळखा आता सैलावला असला तरी कोरोनाची तिसरी लाट येणार या चर्चेने सर्वत्र भीतीचे वातावरण आहे. सर्वांनीच सावधगिरी घेतली तर पुढची लाट येणारही नाही. पण आपली तयारी असावी म्हणून आणि कोरोना लाट आलीच तर ऑक्सिजनची कमतरता भासू नयेत आणि रुग्णांचे प्राण वाचावेत, या हेतूने हा प्रकल्प सुरू करण्यात आला आहे, असे देसाई यांनी सांगितले.

या प्रकल्पाच्या माध्यमातून महापालिकेचे कोविड हॉस्पिटल ऑक्सिजन निर्मितीत स्वतः पुढाकार घेत आहे ही स्वागतार्ह बाब असल्याचेही देसाई म्हणाले. या प्रकल्पाला दीपक फर्टिलायझर्स कंपनीचे आर्थिक पाठबळ लाभले आहे. सचिन अहिर दीपक फर्टिलामझर एम्प्लॉइज युनियनचे अध्यक्ष असून त्यांच्या प्रयत्नांमुळे हा प्रकल्प उभा राहिला. याप्रसंगी खासदार चंद्रकांत खैरे, आमदार अंबादास दानवे, संजय शिरसाट, प्रदीप जैस्वाल, तसेच आयुक्त आस्तिक पांडेय उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ranji Trophy: पृथ्वी शॉ झाला महाराष्ट्राचा कर्णधार! ऋतुराज गायकवाडला संघात स्थान का नाही? पाहा संपूर्ण टीम

Satara Girl Death : सेकंदाच्या रागात उद्ध्वस्त झालं कुटुंब! साताऱ्यात शिक्षक बापानं 17 वर्षाच्या पोरीला क्रिकेटच्या बॅटनं संपवलं; मृत्यूनंतर पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न?

पुण्यातील 'या' ठिकाणी झालेलं माहेरची साडी सिनेमाचं शुटिंग, सिनेमातील घर आठवतय का? अजूनही गाजलेलं शूटिंग लोकेशन!

Latest Marathi News Live Update : छत्रपती संभाजीनगर पदवीधरमधून सतीश चव्हाण यांना राष्ट्रवादीकडून उमेदवारी जाहीर

Kalika Mata Tradition: माते, काही चूक झाली असेल तर माफ कर’; येरोळमध्ये कालिका मातेला गावात आणण्यासाठी अनोखी परंपरा, नेमकी काय आहे परंपरा?

SCROLL FOR NEXT