Esakal
महाराष्ट्र बातम्या

श्रीराम पवार यांच्या ‘अस्वस्थपर्व’चे गुरुवारी साताऱ्यात प्रकाशन

पृथ्वीराज चव्हाण, डॉ. दाभोळकर यांची उपस्थिती

सकाळ डिजिटल टीम

कोल्हापूर: ‘सकाळ’ माध्यम समूहाचे संपादक संचालक श्रीराम पवार (Shriram Pawar)लिखित ‘अस्वस्थपर्व- वेध जागतिक घडामोडींचा’ या पुस्तकाचे प्रकाशन गुरुवारी (ता. १३) साताऱ्यात होणार आहे. ज्येष्ठ विचारवंत व सुप्रसिद्ध लेखक डॉ. दत्तप्रसाद दाभोळकर (Dr. Dattaprasad Dabholkar) यांच्या प्रमुख उपस्थितीत आणि माजी मुख्यमंत्री, आमदार पृथ्वीराज चव्हाण (Prithviraj Chavan) यांच्या अध्यक्षतेखाली येथील यशवंतराव चव्हाण इन्स्टिट्यूट ऑफ सायन्सच्या (वायसी कॉलेज) सभागृहामध्ये सायंकाळी साडेचार वाजता कोविड नियमांचे पालन करून हा कार्यक्रम होईल.

जगाच्या अनेक भागांत सध्या वंश, धर्म अशा बाबींवर आधारलेला बहुसंख्याकवाद बोकाळतो आहे. हे होत असताना अल्गोरिदम, आर्टिफिशियल इंटेलिजन्स, रोबोटिक्स, डेटा सायन्स ही वर्चस्वाच्या लढाईची हत्यारे बनत आहेत. यातून होणारे नवे ताण, नवी स्पर्धा जगाच्या अस्वस्थतेत भर टाकते आहे. या अस्वस्थ करणाऱ्या घटना-घडामोडींचा वेध श्री. पवार यांनी या पुस्तकात घेतला आहे.

हे पुस्तक ‘सकाळ’ प्रकाशनाने प्रकाशित केले असून, श्री. पवार यांच्या या आधीच्या धुमाळी, मोदीपर्व, संवादक्रांती, ड्रॅगन उभा दारी आदी पुस्तकांना वाचकांनी भरभरून प्रतिसाद दिला आहे. याच मालिकेतील हे सातवे पुस्तक आता प्रसिद्ध होत आहे.

कार्यक्रम फेसबुक लाईव्हवर

हा कार्यक्रम कोविड प्रतिबंधक नियमांच्या अधीन राहून होत असल्याने मर्यादित निमंत्रकांसाठीच आहे. मात्र, ‘सकाळ’च्या फेसबुक पेजवरून (https://www.facebook.com/sakal) हा कार्यक्रम घरबसल्या पाहता येणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

महाराष्ट्र महिला आयोगाच्या पुढील अध्यक्षा कोण? दोन दमदार महिला नेत्यांची नावे समोर, नव्या चेहऱ्यांबाबत मोठी माहिती समोर

तुंबाडची मंजुळा सिनेमा दिग्गज कलाकारांची मांदियाळी ! अनोखी कल्पना वापरत उलगडली कास्ट

Corporation Water Crasis : कोल्हापुरात पाणीपुरवठ्यावरून वाद; महापालिका-जलसंपदा आमनेसामने, पदाधिकाऱ्यांची कडक भूमिका

Pune-Nashik Railway: पुणे-नाशिक सेमी हायस्पीड रेल्वे प्रकल्पाबाबत मोठी अपडेट! निधी माघारी घेण्याची प्रक्रिया सुरु, कारण काय?

Financial Planning: 50,000 पगारातही बचत नाही? 15 दिवसांत पैसे संपतात? तज्ञांनी सांगितलेले हे 5 नियम वापरा आणि पैशांची टेन्शन संपवा

SCROLL FOR NEXT