School 
महाराष्ट्र बातम्या

मोठी बातमी ! शाळांना 31 ऑगस्टपर्यंत टाळेच; गावकऱ्यांच्या ठरावानंतरच सुरू होणार शाळा 

तात्या लांडगे

सोलापूर : ऑगस्ट महिन्यात ज्या गावांमध्ये एकही कोरोनाचा रुग्ण सापडलेला नाही, अशा गावांमधील शाळा व्यवस्थापन समितीने पालकांचे प्रतिनिधी म्हणून शिक्षण विभागाला ठराव द्यायचा आहे. त्या ठरावानुसार सप्टेंबरपासून शाळा सुरू केल्या जाणार आहेत. मात्र, लॉकडाउन 31 ऑगस्टपर्यंत वाढविल्याने तूर्तास राज्यातील संपूर्ण शाळा, महाविद्यालयांना टाळेच राहणार असल्याचे शिक्षण विभागाने स्पष्ट केले. 

राज्यातील सिंधुदुर्ग, वर्धा, भंडारा, गोंदिया व गडचिरोली या जिल्ह्यांमधील ऍक्‍टिव्ह रुग्णसंख्या शंभरपेक्षा कमी आहे. तर मुंबई, ठाणे, पालघर, पुणे, नाशिक, जळगाव, औरंगाबाद या जिल्ह्यांमध्ये रुग्णसंख्या आणि मृतांची संख्या सर्वाधिक राहिली आहे. त्यामुळे असे जिल्हे वगळता उर्वरित जिल्ह्यांमधील शाळा सुरू करताना आरोग्य विभागाचा अभिप्राय घेतला जाणार आहे. तसेच मुलांच्या आरोग्याच्या दृष्टीने शाळा सुरू करण्याबाबत पालकांचे संमतीपत्र लागणार आहे. सद्य:स्थितीत "शाळा बंद अन्‌ शिक्षण सुरू' यानुसार ऑनलाइन शिक्षणावर भर दिला जात असून, त्यासाठी दूरचित्रवाणी, आकाशवाणीचीही मदत घेतली जात आहे. मात्र, ऑनलाइन शिक्षणापासून चार हात लांब असलेल्या विशेषत: डोंगराळ भागातील विद्यार्थ्यांना ऑनलाइन शिक्षणाचा काहीच लाभ होत नसल्याचेही चित्र आहे. या पार्श्‍वभूमीवर आता सप्टेंबरपासून शाळा सुरू करण्याच्या हालचालींना वेग आला आहे. 

ऑगस्टपर्यंत बंदच राहतील शाळा 
माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचे संचालक दिनकर पाटील म्हणाले, राज्य शासनाच्या सुधारित परिपत्रकानुसार राज्यातील सर्व शाळा, महाविद्यालये 31 ऑगस्टपर्यंत बंद राहतील. त्यानंतर जिल्हानिहाय परिस्थिती पाहून निर्णय अपेक्षित आहे. मात्र, त्यासाठी संबंधित गावातील शाळा व्यवस्थापन समितीचा ठराव गरजेचा आहे. तत्पूर्वी, शाळा कधीपासून सुरू होतील, हे आताच सांगणे कठीण आहे. 

ठळक बाबी... 

  • किमान एक महिन्यापर्यंत कोरोनाचा रुग्ण सापडला नसलेल्या गावातील शाळा सुरू करण्याचे नियोजन 
  • शाळा, महाविद्यालये सुरू करण्यासंबंधी गावातील शाळा व्यवस्थापन समितीवर सोपविला निर्णय 
  • पालकांचे प्रतिनिधी म्हणून शाळा व्यवस्थापन समितीला शाळा सुरू करण्याबाबतचा द्यावा लागणार ठराव 
  • शाळा, वर्गखोल्या सॅनिटायझिंग अन्‌ विद्यार्थ्यांना मास्क वापरणे बंधनकारक 
  • 31 ऑगस्टनंतर शाळा व्यवस्थापन समितीने शिक्षण विभागाला ठराव सादर करण्याच्या सूचना 

संपादन : श्रीनिवास दुध्याल

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 1st T20I: Abhishek Sharma ने घडवला इतिहास, पावसाच्या सरींमध्ये इंग्लंडविरुद्ध वादळी फिफ्टी ठोकत विश्वविक्रम रचला

IND vs ENG: पहिल्या T20I सामन्यात ऐनवेळी ड्रामा; अभिषेक-श्रेयसने इंग्लंडला धुतलं, पण शेवटी पावसानं खोडा घातला

IND vs ENG: अभिषेक शर्माचं वादळ घोंगवलं, तर कर्णधार श्रेयस अय्यरचेही अर्धशतक; भारताचे इंग्लंडसमोर मोठे लक्ष्य

Raigad Rain Alert: रायगडमध्ये मुसळधार पावसाचा इशारा; अलिबागसह सात तालुक्यांतील शाळा व अंगणवाड्यांना सुट्टी

Woman Success Story: ३३ गुंठ्यात फुलली यशाची बाग! दरमहा २०-२५ हजारांचा निव्वळ नफा; वडगाव आनंदच्या महिला शेतकऱ्यांची शेती ठरली इतरांसाठी प्रेरणादायी..

SCROLL FOR NEXT