Ayodhya Paul esakal
महाराष्ट्र बातम्या

Ayodhya Paul : ठाकरे गटाच्या नेत्या अयोध्या पौळ यांच्यावर शाईफेक; कळव्यात घडली घटना

संतोष कानडे

मुंबईः ठाकरे गटाच्या नेत्या अयोध्या पौळ यांच्यावर शाईफेक झाल्याची घटना घडली आहे. ठाण्यातल्या कळवा येथे ही घटना घडली आहे.

'सामना ऑनलाईन' या ट्वीटर अकाऊंटवर यासंबंधीची माहिती देण्यात आलेली आहे. अयोध्या पौळ एका कार्यक्रमासाठी कळव्यात होत्या. त्यावेळी त्यांना काही जणांनी घेरले आणि शाई फेकली. केवळ शाईफेक नाही तर मारहाण झाल्याचा आरोप करण्यात येत आहे.

''शिवसेनेच्या (उद्धव बाळासाहेब ठाकरे) महाराष्ट्र सोशल मीडिया समन्वयक अयोध्या पौळ यांच्यावर कळव्यात टोळक्याची भ्याड शाईफेक - एका कार्यक्रमासाठी कळव्यात आलेल्या अयोध्या यांना काही जणांच्या टोळक्याने घेरले आणि शाई फेकली '' असं ट्वीट करण्यात आलेलं आहे.

अयोध्या पौळ यांनी काही दिवसांपूर्वी आमदार संतोष बांगर यांना डिवचलं होतं. राज्यभरात कृषी उत्पन्न बाजार समित्याच्या निवडणुका पार पडल्या. त्यामध्ये हिंगोली येथील कळमनुरी बाजार समितीमध्ये १७ पैकी १७ जागांवर विजय मिळवणार असल्याचा दावा बांगर यांनी केला होता. पण त्यांना फक्त ५ जागांवर विजय मिळवता आला आहे. त्यामुळे ठाकरे गटाच्या पदाधिकारी आयोध्या पौळ यांनी त्यांच्यावर निशाणा साधत मिशा कधी काढणार असा सवाल केला होता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT