Ram Mandir Inauguration Invitation esakal
महाराष्ट्र बातम्या

Ram Mandir Inauguration Invitation: रामलल्लाच्या दर्शनासाठी 'VIP' वरून जुंपली; ठाकरे गट-भाजपमध्ये नेमका वाद काय?

गिरीश महाजन यांनी उद्धव ठाकरे हे पहिल्यांदाच विधान परिषदेचे साधे आमदार झालेले असल्याने त्यांचे नाव ‘व्हीव्हीआयपीं’च्या यादीत नसेल, असे सांगत राज ठाकरे यांच्या नावाचा मात्र या यादीमध्ये समावेश करण्यात आला असल्याचा चिमटा काढला.

सकाळ वृत्तसेवा

Ram Mandir Inauguration Invitation

मुंबई: अयोध्येत राम मंदिराच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्यासाठी उपस्थित राहणाऱ्या अतिमहत्त्वाच्या निमंत्रितांच्या यादीत ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांचे नाव नसल्याने आरोप-प्रत्यारोप सुरू झाले आहेत. भाजपचे मंत्री गिरीश महाजन यांनी उद्धव ठाकरे हे पहिल्यांदाच विधान परिषदेचे साधे आमदार झालेले असल्याने त्यांचे नाव ‘व्हीव्हीआयपीं’च्या यादीत नसेल, असे सांगत ‘मनसे’चे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या नावाचा मात्र या यादीमध्ये समावेश करण्यात आला असल्याचा चिमटा काढला.

श्रीराम मंदिराच्या कार्यक्रमासाठी अयोध्येत जोरदार तयारी सुरू आहे. व्हीव्हीआयपी लोकांना निमंत्रण पाठविण्यात आले असून उद्धव ठाकरेंना मात्र डावलण्यात आले आहे. राज यांना मात्र सोहळ्याचे निमंत्रण मिळाल्याची चर्चा आहे. याच मुद्यावरून खासदार संजय राऊत यांनी आज पुन्हा भाजपवर निशाणा साधताना पंतप्रधान मोदींवर हल्ला केला.

‘मंदिरात जाणारा हा भक्त असतो. पण या देशात मंदिरात जाणारा एकमेव व्हीआयपी म्हणजे नरेंद्र मोदी.’ मोदी हे भगवान विष्णूचे तेरावे अवतार असल्याचे पोस्टर काही ठिकाणी लावण्यात आले आहेत त्यावरून राऊत यांनी सडकून टीका केली. भाजपने आधी कोण व्हीआयपी आणि कोण सामान्य यावर बोलावे असेही राऊत यांनी सुनावले आहे.

‘आम्ही सामान्य म्हणून राम मंदिराच्या लढ्यात उतरलो. तेव्हा आजचे व्हीआयपी कोठे गेले होते? राम मंदिर पाडले तेव्हा ही लोकं कुठे होती?’ असे सवालही राऊत यांनी उपस्थित केले आहेत. बाळासाहेब ठाकरेंनी तेव्हा पुढे येऊन रामजन्मभूमी आंदोलनाची जबाबदारी घेतली तेव्हा हे कुठे गेले होते? असाही सवाल त्यांनी भाजपला केला आहे.

उद्धव ठाकरे हे साधे आमदार आहेत त्यामुळे केंद्राच्या ‘व्हीव्हीआयपी’च्या यादीत ते नसतील पण राज ठाकरे यांचा मात्र समावेश असेल. अयोध्येतील राम मंदिराच्या उभारणीत उद्धव ठाकरेंचे योगदान काय? घरात बसून भूमिका घेणे आणि प्रत्यक्ष कारसेवा करणे यात फरक आहे. आम्ही वीस दिवस कारागृहामध्ये होतो. तेव्हा संजय राऊत आणि उद्धव ठाकरे कुठे होते? बाळासाहेब ठाकरे यांच्या भूमिकेबाबत दुमत नाही. मात्र जे बोलतायेत ते आयत्या बिळावरचे नागोबा आहेत.

- गिरीश महाजन, मंत्री आणि भाजप नेते

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Online Gaming: PokerBaazi कंपनीचा शेअर कोसळला, 2 दिवसांत 20 टक्के घसरण; गुंतवणूकदारांचे 2,000 कोटी रुपये बुडाले

Viral Video: इंस्टा जाम, गुलाबी साडीत किन्नरचं सौंदर्य... सोशल मीडियावर धुमाकूळ, चक्क ६.२५ कोटी लोक झाले फिदा!

रोहितनंतर सूर्यकुमार यादवचीही विकेट पडणार? गौतम गंभीर 'लाडक्या'ला कर्णधार करणार

Maharashtra Latest News Update: बाळासाहेब थोरात यांच्या समर्थनार्थ निघालेल्या मोर्चाला प्रचंड गर्दी...

Video : तुम्हीपण असा डबा वापरता काय? बाबांनो, जेवणाचं होईल विष, धक्कादायक व्हिडिओ पाहा

SCROLL FOR NEXT