Baba Adhav

 

esakal

महाराष्ट्र बातम्या

Baba Adhav refused Maharashtra Bhushan honour :...म्हणून बाबा आढाव यांनी नाकारला होता राज्याचा सर्वोच्च सन्मान, ‘महाराष्ट्र भूषण’!

Baba Adhav who declined Maharashtra Bhushan award : जाणून घ्या, नेमकं काय म्हणत बाबांनी तेव्हा त्यांच्यातील संवेदनशीलतेचे आणि कष्टकऱ्यांविषयी असणाऱ्या तळमळीचे दर्शन घडवले होते.

सकाळ वृत्तसेवा

Reason behind Baba Adhav refused Maharashtra Bhushan : डॉ. बाबा आढाव यांना २०२० मध्ये ‘महाराष्ट्र भूषण’ पुरस्कार जाहीर होणार होता. मात्र ‘महाराष्ट्र भूषण पुरस्कार हा सरकारी अलंकार म्हणजे एक प्रकारची बेडी आहे व त्या मार्गाने जावू नये, असे माझे मन मला सांगत आहे. त्यामुळे कष्टकऱ्यांसोबतच नाते कायम अबाधित ठेवण्याचा माझा प्रयत्न असेल’, असे सांगत बाबांनी हा राज्याचा सर्वोच्च सन्मान नाकारला होता.

डॉ. आढाव यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार मिळावा, यासाठी २०२० मध्ये तत्कालीन आमदार कपिल पाटील, पत्रकार निखिल वागळे यांनी प्रयत्न केले होते. त्यासाठी त्यांनी तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र दिले होते. मात्र शासकीय पुरस्कार म्हणजे सरकारी बेडी असल्याचे सांगत बाबांनी या पुरस्कारासाठी कोणीही प्रयत्न करू नयेत, असे आवाहन केले होते.

तसेच, ‘‘शासकीय पुरस्कारांनी मिळणाऱ्या प्रोत्साहनाची मला गरज नाही. कोरोनामुळे लाखो मजुरांचे लोंढे गावाकडे परतत आहे. त्यांचे भविष्य अंधुक दिसत आहे. त्यांच्यासाठी काही तरी उपाययोजना करण्याची गरज आहे. शाळा बंद असल्यामुळे शिक्षण थांबले आहे. हमाल किंवा कष्टकऱ्यांची मुले कसे काय ऑनलाईन शिक्षण घेऊ शकतील, हे प्रश्न मला सतावत आहेत. अशा परिस्थितीत पुरस्कार मिरवणे मला नको आहे’’, असे म्हणत बाबांनी त्यांच्यातील संवेदनशीलतेचे आणि कष्टकऱ्यांविषयी असणाऱ्या तळमळीचे दर्शन घडवले होते.

ज्येष्ठ समाजसेवक डॉ. बाबा आढाव यांचे आज(सोमवार) पुण्यात निधन झाले. पूना हॉस्पिटलमध्ये गेल्या बारा दिवसांपासून त्यांच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरू होते. सुरुवातीला ते उपचारांना प्रतिसाद देत होते. मात्र त्यांची किडनी निकामी झाली होती. अखेर आज ०८डिसेंबर रोजी रात्री ०८ वाजून २५ मिनिटांनी त्यांना हृदयविकाराचा झटका आला आणि त्यांचे निधन झाले.

बाबा आढाव यांचे पार्थिव उद्या सकाळी दहा वाजल्यापासून त्यांच्या सर्व चळवळींचे केंद्र असलेल्या तसेच इतर परिवर्तनवादी चळवळींचे केंद्र असलेल्या मार्केट यार्ड येथील हमाल भवन येथे अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात येणार आहे. सायंकाळी साडेपाच वाजता कोणतेही धार्मिक विधी न करता वैकुंठभूमी स्मशान भूमीतील विद्युत दाहिनीत अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MLC Elections: जागा १, पण ७५ दावेदार! राष्ट्रवादीत तिकीटासाठी महाभारत; निर्णय कधी? निकष सांगत पक्षश्रेष्टींनी वेळच सांगितली

Mysore Sandal Record Turnover : 110 वर्षांची परंपरा अन् 2000 कोटींची झेप! 'म्हैसूर सँडल'ने रचला इतिहास; नफ्याचा आकडा वाचून थक्क व्हाल

Jalna News: मंठा शहरातील सुगंधानगरात दुर्गंधी!; घंटागाडी फिरकेना; नाल्या कचऱ्याने तुडुंब, डासांचाही प्रादुर्भाव

Jalna News: रुंदीकरणानंतर हरवली सिल्लोड रस्त्याची हिरवळ; वृक्षलागवड टाळून कंत्राटदाराकडून विश्वासघात, सावलीचा रस्ता बनला ‘काँक्रीट पट्टा’

Wedding Special: साडीऐवजी ३०० वऱ्हाडींना ‘ज्ञानेश्वरी’चा आहेर; कदम परिवाराचा आदर्श, विठ्ठलवाडीतील विवाह सोहळ्यात वाचन संस्कृतीचा संदेश..

SCROLL FOR NEXT